Chandwad

लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नियमांचे पालन करावे-प्रांताधिकारी देशमुख

लसीकरण केंद्रावर नागरिकांनी नियमांचे पालन करावे-प्रांताधिकारी देशमुख

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरात सुरू असलेल्या कोविड लसीकरण केंद्रावर चांदवडचे प्रांत अधिकारी श्री चंद्रशेखर देशमुख यांनी पाहणी केली असता काही नागरिक अंतर न ठेवता गप्पा मारताना आढळले,यावेळी प्रांताधिकारी यांनी मात्र नागरिकांना कडक भाषेत सुनावले.यापैकी 1 जरी पॉझिटिव्ह असेल तर फैलाव होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी 6 फुटाचे अंतर ठेवून उभे राहावे किंवा वयस्कर व्यक्तींनी बसून घ्यावे.नियमांचे पालन न केल्यास केंद्र बंद करून टाकू अशी तंबी दिल्यावर नागरिक बरोबर पांढऱ्या चौरसात बसलेले दिसले .यावेळी प्रांताधिकारी यांनी कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना उपस्थित नागरिकांना ध्वनिक्षेपकाद्वारे दिल्या.यावेळी चांदवड नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम, अभियंता श्री शेषराव चौधरी,न प कार्यालय अधिक्षसक हर्षदा राजपूत, आरोग्य पर्यवेक्षक वाय बी जाधव,घनश्याम आंबेकर,घाटे,दीपक जामदार,जनता शाळा मुख्याध्यापक श्री पगार सर,शिंदे सर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button