Chandwad

शहरातील नागरिकांनी स्वछता संबंधी नियमाचे पालन करावे- सत्यवान गायकवाड

शहरातील नागरिकांनी स्वछता संबंधी नियमाचे पालन करावे- सत्यवान गायकवाड

चांदवड उदय वायकोळे

महाराष्ट्र शासनाने हळूहळू कोविड अनलॉक प्रक्रिया सुरू केलेली आहे.कोविड 19 च्या प्रादुर्भावापासून बचाव करणेसाठी शासन वेळोवेळी गाईडलाईन देत आहेत,त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे चांदवड नगरपरिषद स्वछता अभियंता श्री सत्यवान गायकवाड यांनी ठोस प्रहारच्या प्रतिनिधींशी बोलताना चांदवड येथे सांगितले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नागरी वस्तीतील काही भागांमध्ये अजूनही पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या चांगल्या प्रमाणात दिसत आहे,या अनुषंगाने सर्व नागरिकांनी बाजारात किंवा अन्यत्र घराच्या बाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक असूनही काही नागरिक मास्क वापरत नसल्याचे आढळून आले आहे. बाजारात नागरिकांनी सोशल डिस्टन्स चे पालन करणे गरजेचे आहे. सर्व दुकानदारांनी शासन नियमांचे पालन करून स्यानेटायझरचा वापर करावा असे आवाहन नगरपरिषद स्वच्छता अभियंता श्री गायकवाड यांनी सांगितले. शहरात वारंवार फवारणी सुरू असून जेथे रुग्ण आढळले तेथे नगरपरिषद फवारणी करीत आहेत मात्र नागरिकांनीसुद्धा स्वछता ठेवणे गरजेचे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button