sawada

?? ठोस प्रहार चे भाकित ठरले खरे… संस्था चालक व शाळा कर्मचारी यांची तातडीची अनाधिकृत बैठक संपन्न सोशल डिसटनसिंग चे वाजले बारा

ठोस प्रहार चे भाकित ठरले खरे

संस्था चालक व शाळा कर्मचारी यांची तातडीची अनाधिकृत बैठक संपन्न
सोशल डिसटनसिंग चे वाजले बारा

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा ता रावेर जि जळगाव येथील अॅगलो उर्दू हाय सावदा या शाळेचे बहुचर्चित तांदूळ विक्री गैर प्रकणा बाबत दि. 24/05/2020 रोजी ठोस प्रहार चे सावदा प्रतिनिधी यांनी
व्हिडिओ मध्ये कबुली देणारे कर्मचारी चा शोध साठी धावपळ

स्टींग ऑपरेशन मध्ये कबुली देणाय्रा कर्मचाय्रावर संस्थेचे कारवाई चे संकेत*
या मथळ्याखाली प्रसिद्ध सविस्तर बातमी खरी ठरली व चौकशी च्या दिवशी महणजे दि. 07/05/2020 रोजी जे कर्मचारी शाळेत उपस्थित होते त्यंची निवडक संस्था चालकां बरोबर आज दि 24/05/2020 रोजी गुप्त ठिकाणी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान घेण्यात आलेल्या मिटींग मध्ये सोशल डिसटनसिंग न ठेवता, मासक चे वापर न करता उघड पणे लाक डाउन चा फज्जा उडवला आहे.

सध्या कोरोना (कोविड 19) चा आपल्या शहरात प्रवेश झाला आहे. या जिव घेण्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आरोग्य विभाग , महसूल विभाग , नगर पालिका प्रशासन, व विशेष पोलिस विभाग जिवाचे रान करीत आहे. या संकटा वर मात करणे कामी प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभे राहुन त्यांचे मनोधैर्य वाढवणे गरजेचे असल्याने प्रभाग तसेच शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून अनावश्यक रित्या घरा बाहेर पडु नये उलट आपापल्या भागात बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींना सरकारी रुग्णालय मध्ये पाठवून विलगीकरण कक्षात राहण्यासाठी प्रोत्साहीत करावे व ही कोरोना साखळी खंडीत करण्या साठी प्रशासनास मदत करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास अनमोल सहकार नोंदवावा.
परंतु या सर्व बाबी ला अपवाद ठरणारे, तसेच वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्यास धोका दायक ठरणारे कार्य सदरील अॅगलो उर्दू हाय.सावदा या शाळेचे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे संचालक एका ठिकाणी सामुहिक रित्या बेकायदेशीर मंडळी जमा करून उघड पणे मिटींग घेऊन (तांदूळ विक्री प्रकरणाची लपवा लपवी करण्या साठी) शासकीय आदेशांची जाणिव पुर्वक पणे पायमल्ली केली. एकीकडे प्रशासन शाळा व कार्यालय बंद, वर्क फ्राॅम होम, निवडकच कर्मचारी यांना कार्यालयात येणेचे आदेशित करीत आहे.आपल्या देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री , आरोग्य मंत्री व गृहमंत्री ऑनलाईन व्हिडिओ काॅनफ्रसींग द्वारे मिटींग चे आयोजन करीत आहे.
तसेच या संकट काळात कोरोना शी मुकाबला करणे कामी मोठ्या उत्साहाने राज्य भरातुन कोविड योद्धा होणे साठी जवळपास बावीस हजार अर्ज करून काम करण्याची तयारी विविध क्षेत्रात काम करणारे लोक दर्शवित आहे.

दुसरी कडे अशे बेजबाबदार संस्थाचालक व शाळा कर्मचारी , सामाजिक व वैयक्तिक आरोग्याची जाण न ठेवता कोणत्या ही प्रकार ची प्रशासनाची अधिकृत परवानगी न घेता सामुहिक रित्या उघड पणे राष्ट्रीय कर्तव्य विसरून मिटींग घेतात.त्यांना
अद्दल घडवणे गर्जेचे नाही का?
व याबाबत अश्या घटनांवर बारकाईने नजर ठेवणारे कर्तव्य दक्ष अधिकारी निश्चितच कायद्याच्या विविध कलमां खाली गुन्हा दाखल करतील अशी पुष्टी जाणकार वर्गातून मिळत आहे.

*प्रतिक्षा*

” सदरील घडवलेला गंभीर घटनाक्रमवर संबंधित शिक्षण विभाग काय कारवाई करेल या कडे सुध्दा गावकरी व वाचकांचे लक्ष लागुन आहे. “

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button