Amalner

22 बकऱ्यांसह पिल्ले चोरीला..!टाकरखेडे येथील घटना..!

22 बकऱ्यांसह पिल्ले चोरीला..!टाकरखेडे येथील घटना..!

अमळनेर तालुक्यात बकऱ्या आणि दुचाकी चोरट्यांनी धुमाकळु घातला असून गांधली पाठोपाठ टाकरखेडा येथून देखील ७३ हजारांच्या २२ बकऱ्या व पिल्ले चोरून नेल्याची घटना घडली आहे.
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील ज्ञानेश्वर नगराज पाटील यांच्या शेत गट नंबर ५/१ मध्ये शेळीपालन व्यवसाय करतात.दि 18 ऑक्टोबर रोजी रात्री शेतातील शेडचे कुलूप तोडून सुमारे ६६ हजार रु च्या २२ बकऱ्या व ७ हजार
रु किमतीची बकऱ्यांची पिल्ले असा एकूण ७३ हजार रुपयांच्या बकऱ्या चोरून नेल्या. १९ रोजी सकाळी रखवालदार मोती पावरा याने मालकाला येऊन घटना संगीतली त्यानंतर शोध घेत असताना थोड्या अंतरावर दोन पिल्ले फक्त मिळाली पण बाकीच्या बकऱ्या मिळाल्या नाहीत. अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button