Dhule

हिरे मेडिकल कॉलेज येथे नॉन कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करा; अन्यथा आत्मदहन करणार समाजवादी पक्षाचा इशारा.

हिरे मेडिकल कॉलेज येथे नॉन कोविड रुग्णालय पुन्हा सुरू करा; अन्यथा आत्मदहन करणार समाजवादी पक्षाचा इशारा.

असद खाटीक

कोरोनाच्या आजाराच्या साथीमुळे धुळे शहरातील
शासकीय हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात बंद करण्यात आलेली नॉन कोविड रुग्ण सेवा पुन्हा सुर केली जावी. विशेषतः प्रसुती विभाग ८ दिवसात सुरु करावा, अन्यथा येत्या ५ ऑक्टोबरला आत्मदहन केले जाईल, असा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला.

कोरोना साथीमुळे हिरे मेडिकल कॉलेजच्या सर्वोपचार
रुग्णालयातील प्रसुती विभाग बंद करण्यात आला असून प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना जवाहर मेडिकल कॉलेज येथे पाठवले जात आहे. जी महिला शासकीय योजनेत बसेल त्यांचीच तेथे प्रसुती आणि उपचार केले जातात, परंतु ज्यांच्याकडे योजनेचे कार्ड नाही किंवा राशन कार्ड नाही त्यांच्याकडून मेडिकल साठी ५ ते ६ हजारbरुपयांचा खर्च वसुल केला जातो, अशा वेळी गोर गरीब लोकांकडून पैसे कुठून येणार? तसेच महिलेला ताप आणि इतर आजार असल्यास हिरे
मेडिकल कॉलेज येथे रेफर करण्यात येते. कोविड तपासणी साठी हिरे मेडिकल कॉलेजला पाठवले जाते. या त्रासामुळे प्रसुती झालेली महिला व तिचे बाळाला जिव गमवण्याची भिती आहे.

अशा काही घटना सुध्दा घडल्या आहेत. त्यामुळे हिरे मेडिकल कॉलेजमध्येच प्रसुती विभाग तात्काळ सुरू करावा अन्यथा समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमीन पटेल यांच्यासह कार्यकर्ते आत्मदहन करतील याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची व प्रशासनाचे असेल असा इशारा समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमीन पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button