Chandwad

चांदवडला ईद ए मिलादुन्नबी

चांदवडला ईद ए मिलादुन्नबी

चांदवड उदय वायकोळे

सध्या भारतभर सुरू असलेल्या कोविड 19 च्या वातावरणामुळे सर्वच सण घरीच साजरे केले जात आहेत.आज दि 30 ऑक्टोबर 2020 रोजी असलेला ईद- ए -मिलाद हा सण मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.सदर सणाच्या दिवशी मुस्लिम समाजातील लहान मुले नमाज पठन व नात शरीफ पठण करून हा सण साजरा करतात.चांदवड शहरातील मुस्लिम समाजातील लहान बालकांनी कोविड 19 चे नियम पाळून, सोशल डिस्टन्स चे पालन करून ईद ए मिलाद ह्या सणाच्या निमित्ताने नमाज पठण केले अशी माहिती चांदवड नगरपरिषद चे नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांनी ठोस प्रहार च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.नगरसेवक यांनी सदर बालकांचा एक व्हिडिओ शेअर करून समाजातील जेष्ठांनी बालकांचे कौतुक सुद्धा केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button