Maharashtra

वटवृक्ष मंदिरातील रक्तदान शिबिरास स्थानिक स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वटवृक्ष मंदिरातील रक्तदान शिबिरास स्थानिक स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट दि, 09 :- कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात मानवी रक्ताची असलेली गरज ओळखून व प्रशासनास सहकार्याच्या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुवारी पार पडलेल्या रक्तदान शिबिरास स्थानिक स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिराचे शुभारंभ अक्कलकोट नगर पालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत, अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, अभिजीत लोके, लक्ष्मी को.ऑ. बँकेचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, डॉ.आदित्य कोतवाल, व मंदिर समितीचे चेअरमन – नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात एकूण ८६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याधिकारी आशा राऊत यांनी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने आजपर्यंत अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. आज कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराच्या संक्रमणाचे सावट संपूर्ण जगासह आपल्या भारत देशावरही आहे. या आजारातून सावरण्यासाठी देशासह आपल्या सोलापूर जिल्ह्यातही विविध प्रशासकीय उपाय योजनांसोबत मानवी रक्ताचीही अत्यंत गरज आहे. ही सामाजिक गरज ओळखून वटवृक्ष मंदिर समितीच्या माध्यमातून चेअरमन महेश इंगळे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून त्यांच्या या कार्यास स्थानिक स्वामीभक्तांचे प्रतिसाद पाहून समाधान वाटले असल्याचे प्रतिपादन केले. या प्रसंगी कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन व जमावबंदी असल्याने रक्तदात्यांना नियोजित वेळ देऊन टप्प्या टप्प्याने रक्तदान शिबिराचे उपक्रम राबविण्यात आले. रक्तदानास आल्यानंतर प्रत्येकास मास्क वापरण्याचीही सक्ती करण्यात आली. रक्तदानाच्या वेळी सोशल डिस्टन्स राखून व मास्क वापरून रक्तदात्यांनीही मंदिर समितीस सहकार्य केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे उपस्थित होते तर शिबीर यशस्वी होण्याकरीता संतोष पराणे, विजय पवार सर, कांत झिपरे, प्रसन्न हत्ते, अमर पाटील, खाजप्पा झंपले, गिरीश पवार, सागर गोंडाळ, रवी मलवे, श्रीकांत नायकोडे, राजू एकबोटे, पिंटू निंबाळकर, माने सर, संदीप गोंडाळ, धनंजय माने, श्रीशैल गवंडी, शैलेश राठोड, अंकुश केत, दयानंद बिडवे, विद्याधर गुरव सर, बाबा सुरवसे, प्रकाश शिंदे, सचिन विभुते, काका सुतार, कुमार सागरे, रवी महिंद्रकर, सुवर्णा सूर्यवंशी, शिवा याळवार, अरविंद पाटील, अनुजा झिपरे, दीपाली हत्ते, गोकुळ गवंडी, योगेश कटारे, काशिनाथ इंडे, महादेव तेली व डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. सुनील हरहरे व सहकाऱ्यानी परिश्रम घेतले.

फोटो ओळ – रक्तदान शिबिराचे शुभारंभ करताना मुख्याधिकारी आशा राऊत, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, समितीचे चेअरमन महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button