Ahamdanagar

आव्हाणेच्या प्रसिद्ध निद्रिस्त गणपती मंदिरात जाण्यासाठी रस्ता मिळेना : मालोजीराव भुसारी

आव्हाणेच्या प्रसिद्ध निद्रिस्त गणपती मंदिरात जाण्यासाठी रस्ता मिळेना : मालोजीराव भुसारी

सुनिल नजन अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निद्रिस्त गणपती मंदिरात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याची तक्रार गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी आणि सरचिटणीस अर्जुन सरपते यांनी शेवगावच्या तहसीलदार भाकड मँडम यांच्या कडे केली आहे.विश्वस्तांचे म्हणणे आहे की सदर जमीन ही ईनामी जमीन गट नंबर ३१४ गणपती मंदिर ट्रस्टच्या मालकीची असुनही ती जमीन खाजगी मालकाच्या ताब्यात असल्याने संबंधित व्यक्ती रस्ता रुंदीकरणासाठी आडकाठी करत आहे. अशी लेखी तक्रार शेवगावच्या तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांच्या कडे दाखल केली होती.शेवगावच्या तहसीलदार भाकड मँडम यांनी ताबडतोब तलाठी गडकर साहेब, आणि मंडल अधिकारी रमेश सावंत यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सदर ठिकाणी जाऊन महसूल विभागाने पंचनामा करून आपला अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे. या मंदिरात जाण्यासाठी पुर्वी खाजगी मालकाच्या जागेतून दक्षिण दिशेने रस्ता होता परंतु सदर रस्ता हा खाजगी मालकाने तारेचे कंपाउंड करून बंद केला आहे सदर मंदिरात जाण्यासाठी मंदिराच्या उत्तर दिशेने पुर्व-पश्चिम असा रस्ता आहे परंतु तो रस्ता अरूंद असल्यामुळे या रस्त्याने डबल वाहने जाउ शकत नाही म्हणून मंदिर समितीने रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मंदिराच्या भिंतीपासुन पंधरा मिटर रुंदीचा रस्ता तयार करण्याचा ठराव मंजूर करून घेतला आहे.परंतु सदर जमीन कसणाऱ्या व्यक्तीने या मंदिरात जाणाऱ्या रस्त्याच्या जागेत जनावरांसाठी शेड, सौचालय,वैरण, टाकून रस्ता अडवून धरला आहे त्यामुळे भाविकांची मंदिरात जाण्यासाठी अतिशय कुचंबणा होत आहे. तलाठी आणि सर्कल यांनी सदर जागेवर जाउन पंचनामा केला त्यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी, सरचिटणीस अर्जुन सरपते,सचिव मुटकुळे सर,विश्वस्त अंकुशराव कळमकर, कारभारी तळेकर, रामदास दिवटे,बबनराव वाणी, शिवाजीराव चोथे,संभाजी दिवटे,शाम झोटींग,तात्या खैरे ईत्यादी पंच उपस्थित असतानाही संबंधीत व्यक्तीने पंचनामा कागदपत्रावर पंचासमक्ष सह्या केल्या नाहीत. कायदेशीर नोटीस पाठवा मग सह्या करतो अशी भुमिका घेतल्या मुळे रस्ता रुंदीकरणाचे तिनतेरा वाजले आहेत. आता तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या रस्ता रुंदीकरणाच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर जिल्हा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button