sawada

सावद्यात बुलेट बाईक लंपास : मात्र चोरटा सि.सि.टीव्ही कॅमेऱ्यात कैद – परंतू पोलीसांचे पुढील तपास सुरू.

सावद्यात बुलेट बाईक लंपास : मात्र चोरटा सि.सि.टीव्ही कॅमेऱ्यात कैद – परंतू पोलीसांचे पुढील तपास सुरू.

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे शहराच्या मुख्य हमरस्त्यावरील दुर्गामाता चौक परिसरात भर वर्दळीचा रस्त्याच्या गजबजलेल्या ठिकाणी व सरदार वल्लभ भाई संकुलन समोर असलेल्या लखन ट्रेडर्स या दुकानाच्या बोळात अमर जेठानंद लालवाणी यांच्या मालकीची बुलेट बाईक दि.१९/११/२०२१ रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. तसेच चोरटा येथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. सदर घटनेची माहिती सावदा पोलिस स्टेशनला देण्यात आलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लखन ट्रेडर्स या दुकानाचे मालक यांचा भाजा अमर लालवाणी यांचे मालकीची बुलेट बाईक (मॉडेल क्र.२०१७) ग्लाशिक ३५०, बाईक क्र. एम.एच १९ – सिऐन.०६८२ सुमारे दोन लाख किंमतीची सिल्वर कलर बुलेट बाईक सदर गजबजलेल्या परिसरातून एका अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडालेली आहे. या घटनेची सूचना सावदा पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे. सदर बाईक ची माहिती देणाऱ्यास इसमास ५१०० ₹ बक्षीस देखील ठेवण्यात आले आहे. तसेच माहिती देणारे इसमाचे नाव सुद्धा गुपित ठेवण्यात येईल असे बुलेट बाईक मालक यांनी सांगितले आहे.

तसेच सदरील परिसर हा नेहमी वर्दळीचा असून संध्याकाळी ८ वाजेच्या सुमारास येथून बुलेट बाईक चोरी होणे म्हणजे चोरट्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही हे सदर घटनेतून सिद्ध होत आहे सबब लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button