Amalner

एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व पुरोगामी संघटनांतर्फे पुकारलेल्या अमळनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व पुरोगामी संघटनांतर्फे पुकारलेल्या अमळनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेत्यांच्या सजगतेने तणाव वेळीच निवळला!

अमळनेर येथिल बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने केंद्र सरकारने लादलेल्या एन आर सी ,सी सी ए कायद्याने हिंदूंसह सर्वच मुस्लिम व इतर धर्मियांच्या अस्तित्वाला धोका ठरणाऱ्या एन आर सी ,सी ए ए कायद्याच्या विरोधात भारत बंद आंदोलनांतर्गत आज दि २९ जानेवारीला अमळनेर बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व पुरोगामी संघटनांतर्फे पुकारलेल्या अमळनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आंदोलनाच्या नेत्यांनी वेळीच दाखवलेल्या सजगतेने बाजारात काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला.सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विनंती केल्याने दुपारून आंदोलकांनी बंद मध्ये ढील देत बंद ऐच्छिक ठेवला.

एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व पुरोगामी संघटनांतर्फे पुकारलेल्या अमळनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसादअमळनेर शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी संख्या रोडावली होती.पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्या ऐवजी घरीच ठेवले.तर लहान व्यावसायिकांनी उत्स्फूर्त पणे दुपारपर्यंत बंद पाळला.मोठ्या व्यावसायिकांनी GST मुळे आधीच मंदी असल्याने व्यवसायावर परिणाम होवू नये म्हणून आंदोलनास पाठींबा असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले.

एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व पुरोगामी संघटनांतर्फे पुकारलेल्या अमळनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद*मांसाहार विक्री बंद*
अमळनेर मटण चिकन खाटीक असोसिएशन व

मच्छी मार्केट असोसिशनकडून बंद मध्ये उत्स्फर्त

सहभाग घेण्यात आल्याने आज दुपारपर्यंत मांसाहार विक्री बंद होती.त्यामुळे अनेक मटण चिकन मासे शॉप हून ग्राहकांना माघारी फिरावे लागले.

*नेत्यांच्या सजगतेने तणाव वेळीच निवळला!*
बाजारापेठेतून शांततापूर्ण पद्धतीने प्रा शिवाजीराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा अशोक पवार,रियाज मौलाना तसेच विजय गाडे,ऍड विश्वास पाटील, प्रा जयश्री साळुंखे,आदिंनी चार चार लोकांच्या समूहाने बाजारातून प्रबोधन पत्रक वाटायला सुरवात केली.बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभागी व्हा असे सांगत गुलाब पुष्प देऊन दुकानदारांना विनंती केली.दुपारी ११.३० ला मोठ्या संख्येने विविध संघटनांचे युवक कार्यकर्ते वेगवेगळ्या रोडवर आणि बाजारात जमायला लागले होते.

एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व पुरोगामी संघटनांतर्फे पुकारलेल्या अमळनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बाजारपेठेत गैरसमजातून वातावरण तापेल अशी परिस्थिती असताना बाजारातील वातावरण तणावपूर्ण होऊ नये , व्यापारी बांधवाना आणि बाजारात येणाऱ्या नागरिकांना म्हणून सर्वांना एक ठिकाणी बोलवून सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी सर्व संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यानां संविधानात्मक मार्गाने बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी बाजारातून शांततेने घरी जाण्यास सांगितल्याने कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणारा अनर्थ टळला. यावेळी काही दुकानदार बांधवानी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रा अशोक पवार ,प्रा शिवाजीराव यांनी कायदयाची माहिती देऊन शंकांचे निरसर केले.पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी स्वतः आंदोलन कर्ते नेत्यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विनंती केल्याने दुपारून आंदोलकांनी बंद मध्ये ढील देत बंद ऐच्छिक ठेवला.

देशातील १३५ कोटी
भारतीय नागरिकांना स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोर्ट कचऱ्याच्या फेऱ्या मारायला लावून त्यांच्या जगण्याचा अधिकार ही हिरावून घेण्याच षडयंत्र केंद्र सरकारने एन आर सी कायद्याच्या माध्यमातून रचलेले आहे. या विरोधात बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी विविध टॅक्सी,रिक्षा युनियन ,व्यावसायिक व व्यापारी संघटनांना व पदाधिकाऱ्यांना पाठिंबा दर्शविला.अमळनेर शहरातील अनेक संघटना बहुजन,आदिवासी, दलित मुस्लिम ओबीसी तसेच युवकांच्या संघटना या बंद आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीनं अमळनेर शहरात चौकात भारत बंद चे फलक दिसले व जनजागृती करणारे प्रचार पत्रकही वृत्तपत्रातून वाटण्यात आलेले होते.विविध भागात व मुस्लिम मोहल्यातून या बंद ला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसून आला.एन आर सी कायद्याच्या संदर्भात व्यापारी संघटना , विविध टॅक्सी,रिक्षा युनियन, व्यावसायिक व इतर दुकानदारांनी आपापल्या परीने शक्य तितक्या काळ दुकाने बंद करून अमळनेर बंद ला प्रतिसाद दिला. अमळनेरातील काही चौकात अंमळनेर बंदमुळे शुकशुकाट दिसून आला.
आंदोलन कर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारत बंद आंदोलनाचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा व तथा राष्ट्रीय किसान मोर्चा चे महाराष्ट्र प्रभारी प्रा. शिवाजीराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,रियाज मौलाना आदींसह प्रा अशोक पवार,प्रा.विजय गाढे ,विश्वास पाटील,राजू मोरे,इम्रान खाटीक, यशवंत बैसाने,दिपक सैंदाने, प्रकाश बोरसे, संजय मरसाळे, गौतम सपकाळे, नगरसेवक शेखा हाजी, नगरसेवक फिरोज पठाण, मुख्तार खाटीक, ऍड शकील काजी, ऍड प्रशांत संदानशिव , हाजी डबिर खा पठाण,इकबाल कुरेशी, जहुर मिस्त्री, हिरालाल पाटील, पन्नालाल मावळे, प्रमोद बिर्हाड़े, सामाजिक कार्यकर्ते संजय पारधी, सोमचंद संदाणशीव, प्रा जितेश संदाणशिव,शराफत मिस्तरी, पोपट निकम,रहीम मिस्तरी, मुशीर शेख,किरण जाधव बहुजन रयत परिषदेचे संजय मरसाले,हरिश्चंद्र गढरे,अब्दुल रहीम मुजावर,मुन्नाभाऊ बैसाणे,भगवान संदानशिव,ऍड रज्जाक शेख,मुकेश ब्राह्मणे,विजय शिरसाठ,अजय गव्हाणे,रमेश मैलागीर आदिसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने शांततापूर्ण मार्गाने शहरातून सर्वांना बंद मध्ये सहभागी होण्याचे विनंती करीत जाहीर आवाहन करीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button