Delhi

अर्थसंकल्प 2020 : कृषी क्षेत्रासाठी तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला संसदेत सुरुवात

अर्थसंकल्प 2020 : कृषी क्षेत्रासाठी तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प..

भाषणातील ठळक मुद्दे :

▪ विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना लाभ, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर.

▪ अन्नदाता ऊर्जादाता होण्यासाठी प्रयत्न करणार, शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर व्हावा म्हणून प्रयत्नशील.

▪ सेंद्रिय खते वापरण्यासाठी प्रोत्साहन, पाण्याची कमतरता असलेल्या 100 जिल्हयांसाठी विशेष काम करणार.

▪ 20 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात येणार, 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ.

▪ शेतकी मालाची वाहतूक सुलभ होण्यासाठी किसान रेल्वे चालविली जाणार.

▪ महिला बचत गटांना प्रोत्साहन देणार, दूध उत्पादकांसाठी खास योजना, 2025 पर्यंत दुग्ध उपन्न दुप्पट करू.

▪ गाव स्तरावर गोदामांची निर्मिती केली जाणार, शेतकऱ्यांसाठी 16 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद.

▪ जिल्हास्तरावर फळबाग विकासासाठी प्रोत्साहन देणार, शेती आणि ग्राम विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद.

▪ मत्स्य उत्पादन 200 लाख टनांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट, किनारपट्टीतील तरुणांसाठी सागरमित्र योजना राबविणार.

▪ 112 जिल्ह्यांमध्ये आयुष्यमान रुग्णालयांची निर्मिती करणार.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button