Chimur

ग्रा प च्या मेंबर भाऊ शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून दे न गा..शालेय विद्यार्थ्यांची रस्त्यासाठी केविलवाणी आर्त हाक

ग्रा प च्या मेंबर भाऊ शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून दे न गा..शालेय विद्यार्थ्यांची रस्त्यासाठी केविलवाणी आर्त हाक

नेरी येथील वार्ड क्र चार मधील रस्ता प्रकरण

प्रतिनिधी चिमूर डॉ, ज्ञानेश्वर जुमनाके ।
चिमूर,,
नेरी नवरगाव मार्गावरील वार्ड क्र चार मधून जाणाऱ्या रस्त्याची मागील काही वर्षापासून दयनीय अवस्था झालीअसून खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून संपुर्ण रस्ता चिखलमय होऊन रहदारी करण्यासाठी नागरिकांना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मागील अनेक वर्षापासून या मार्गाच्या बांधकामासाठी वार्डातील जनता ग्रा प ला मागणी करीत आहेत अर्ज निवेदन आंदोलन करूनही ग्रा प दुर्लक्ष करीत असून निव्वळ आश्वासन देत आहे तेव्हा शाळेकरी विद्यार्थिनी या मार्गावरून जात ग्रा प मेबरला रस्ता बनवून देण्यासाठी गीत सादर करून केविलवाणी आर्त हाक दिली आहे या चिमुकल्याचे आर्त हाक समाजमाध्यमावर व्हायरल झाली असून नागरिकांचे लक्ष वेधत असून मन सुन्न करीत आहे तेव्हा आता तरी झोपलेल्या ग्रा प ला जाग येथे की नाही यासाठी नेरिवासीय जनतेचे लक्ष लागले आहे
नेरी येथील वार्ड क्र चार मधील रस्ता मागील काही वर्षांपासून दयनीय अवस्थेत असून नाविणकारणाच्या प्रतीक्षेत आहे यासाठी येथील नागरिकांनी अनेक निवेदन अर्ज आंदोलन केले परंतु स्थानिक प्रशासन ग्रा प ने नुसते आस्वासन दिले आहे परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही तसेच वार्डातील ग्रा प सद्स नुसते बघव्याची भूमिका घेत आहेत
नुकतेच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेवटची घटका मोजनारा रस्ता डबके भरून चिखलमय झाला आहे जावे कुटून कसे रहदारी करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे हा महत्वाचा मार्ग असून शाळेकरी मुले याच मार्गानी जात असतात या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे तेव्हा त्यांनी रस्त्यावर उभे राहून मार्ग नवीन बनवून देण्यासाठी केविलवाणी हाक गीताच्या माध्यमातून ग्रा प मेबरांना साद दिली आहे” मेंबर भाऊ मेंबर भाऊ शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून दे न गा, नको सिमेंट, नको डांबर,चुरी तरी टाकून दे न गा शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवून देन गा” अशी केविलवाणी साद विद्यार्थीनिनी घातली आहे सदर चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली असून नागरिकांचे मन सुन्न करीत असून ग्रा प च्या कार्याचा बोलबाला करीत आहे सर्वत्र नागरिक ही चित्रफीत बघत असून ग्रा प ढिशाळ कार्याची पावती देत असतीलच आता तरी ग्रा प दखल घेऊन रस्ता बनवून कार्य करावे हवे दावे हेतुपुरस्सर कानाडोळा करणे सोडून जनतेच्या प्रश्ननाना वाचा फोडावी या शालेय चिमुकल्याच्या आर्त हाकेला धावून जाऊन मार्ग बनवून द्यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत सदर प्रश्न याही वेळेस दुर्लक्षित झाला तर वार्डातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन विस्फोट होईल आणि नागरिक मागचा पुढचा विचार न करता टोकाचे पाऊल उचलेल असा कडक इशारा प्रहार संघटनेने दिला असून याला सर्वस्वी ग्रा प प्रशासन जवाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा प्रहार सेवक प्रवीण वाघे यांनी दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button