Pandharpur

स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक युवकांनी पुढे येऊन उद्योजक बनले पाहिजे- समाधान ( दादा ) आवताडे

स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक युवकांनी पुढे येऊन उद्योजक बनले पाहिजे- समाधान ( दादा ) आवताडे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक युवकांनी पुढे येऊन उद्योजक बनले पाहिजे असे मत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान (दादा )अवताडे यांनी कासेगाव येथे परिवर्तन ग्राम विकास पॅनल यांच्या वतीने युवा उद्योजकांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले होते .त्याप्रसंगी ते बोलत होते. या देशाला जागतिक मंदीतून सावरण्याचे काम फक्त युवकच करतील भारत देशा युवापिढीचा देश आहे या युवकांना ताकद दिली तर नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. कासेगाव परिसरामध्ये द्राक्ष बागायत क्षेत्र जास्त असल्यामुळे कोरोना काळामध्ये द्राक्ष बागाची उत्पन्न निघाले परंतु दर न मिळाल्यामुळे शेतकरी नुकसानी मध्ये गेला म्हणून या पुढच्या काळात शेतीसुद्धा करत असताना काळजीने केली पाहिजे. शेती करत असताना माती परीक्षण पाणी परीक्षण करून त्याचा पीएच तपासून घेऊनच शेती करायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केली. उद्योग करत असताना अडचण आली तर वेळोवेळी मदत करण्यास मी तयार आहे असे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले.
कासेगाव खिलारे वस्ती येथे पांडुरंग खिलारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पांडुरंग खिलारे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाच्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक जय नाना देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले . प्रगतशील द्राक्ष बागायतदार संतोष ( काका )देशमुख यांनी समाधान दादा यांच्या कार्याचा गौरव करत एक तालुक्याला चांगलं नेतृत्व मिळालं आणि म्हणूनच मी म्हणतोय विषय गंभीर तर समाधान दादा खंबीर.
यावेळी परिवर्तन ग्रामविकास पॅनल चे लक्ष्मण जाधव म्हणाले समाधान दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यापुढील काळात आपण काम करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी परिवर्तन ग्राम विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांचा सत्कारही ठेवण्यात आला होता .सर्वांचा सत्कार पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लाडके नेतृत्व समाधान दादा अवताडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे आवर्जून उपस्थित असणार लक्ष्मण जाधव, समाधान घायाळ, भीमा (आबा)भुसे , राजू घायाळ, कासेगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य मारुती नाना काळे, सुरेश जाधव, परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे प्रमुख तुकाराम आबा कुरे , चंद्रभागा कारखान्याचे माजी संचालक भारत भुसे, सज्जन जाधव, हनुमंत ताटे, चंदुलालभाई मुजावर, चंद्रकांत देशमुख, चंद्रकांत जाधव, समाधान गाढवे, राजू घायाळ, पिंटू भालेराव, दत्तात्रय भुसे, विष्णू भुसे,कुबेर जाधव, यादव मोरे, अब्दुल भट्टीवाले , कुंडलिक जाधव, बाबासाहेब खटकाळे, सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक युवकांनी पुढे येऊन उद्योजक बनले पाहिजे- समाधान ( दादा ) आवताडे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button