Sangali

जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वशी व व्हिजन सिक्युरिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा सन्मान सोहळा 2023 संपन्न..

जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वशी व व्हिजन सिक्युरिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा सन्मान सोहळा 2023 संपन्न..

जनक्रांती सेवा सेना संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 2013 साली वशी गावातील हायस्कूल जि प शाळा व वस्ती शाळा यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेचे युगामध्ये परीक्षा देण्यासाठी त्यांच्या बूद्धीला चालना देणे कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्या मनातील भीती कमी करून स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण करण्यासाठी ब्रँड डेव्हलपमेंट परीक्षेची सुरुवात करण्यात आली यामध्ये जनक्रांती सेवा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांची ब्रेंन डेवलपमेन्ट परीक्षा घेऊन या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपात रक्कम सन्मान चिन्ह दिले जायचे हे काम अविरतपणे सुरू असतानाच 2017 सारी जनक्रांतीचे संस्थापक सदस्य व व्हिजन सिक्युरिटी पुणे यांचे उद्योजक मोहन पाटील यांनी या परीक्षेला चालना देण्यासाठी 2017 पासून मोठ्या योगदान देवून परिक्षेची बक्षिसाची व्यात्पी वाढवली तसेच 2018 पासून जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना केल्यापासून जनक्रांती सेवा सेना संघटनेने सुरू केलेली ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा एक वेगळे स्वरूप देऊन यामध्ये वशी हायस्कूल वशी जि प शाळा वशी या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान भूगोल इतिहास परिसर अभ्यास विषयाशी निगडित सर्व विषयांवरती व काही चालू घडामोडी वरती या विद्यार्थ्याची परीक्षा जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या व व्हिजन सिक्युरिटी पुणे यांचे माध्यमातून घेण्याचे काम अविरतपणे सुरू आहे फक्त कोरोना मधील कालावधी सोडला तर जनक्रांतीच्या माध्यमातून हे काम नऊ वर्ष सातत्याने सुरू आहे. आणि 26 जानेवारी 2023 रोजी या उपक्रमास दहा वर्ष पूर्ण होत आहेत या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनामध्ये खूप मोठी पावले टाकले आहेत या वर्षी सुद्धा ही ब्रेन्ड डेव्हलपमेंट परीक्षा वस्ती शाळा हायस्कूल व जि प शाळा मध्ये घेण्यात आली 325 विद्यार्थी यांनी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये ज्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या 30 विद्यार्थीना या वर्षी देखील 26 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वशी गावातील भगवा चौक येथील व्यासपीठावरती विशेष सन्मान सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले व *विशेष म्हणजे सध्या महाराष्ट्र शासनाच्या जि प शाळा बंद पडण्याच्या मार्गावर ती असतानाच गावातील पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा देण्यासाठी सर्वांनाच शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले* यामध्ये विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पञ व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यासाठी व्हिजन सिक्युरिटी पुणे उद्योजक मोहन पाटील जनक्रांती संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील सचिव भगवान पाटील, जनक्रांती च्या महिला अध्यक्षा माया पाटील कार्याध्यक्ष आकाश पाटील सदस्य महादेव जासूद, संगीता पाटील, सीमा पाटील, किरण पाटील, वशी हायस्कूलचे मुख्याध्यापक मल्हार सर व सर्व शिक्षक स्टाफ वशी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच ग्रा. पं सदस्य पोलीस पाटील वशी परिसरातील सर्व ग्रामस्थांनी विध्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button