Nashik

काळोखातही प्रकाश देणार्या “महावितरण”चा सन्मान

काळोखातही प्रकाश देणार्या “महावितरण”चा सन्मान

सुनील घुमरे नाशिक

Nashik : नाशिक जिल्ह्यातील कांदा द्राक्षे टोमॅटो इत्यादी सर्व भाजीपाला
उत्पादनासाठीबाजारपेठ असलेले मोठी बाजारपेठ
पिंपळगाव बसवंत लॉकडाऊन काळात ग्राहकांना सेवा; सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांच्याकडून सत्कार

कोरोना महामारीत महावितरणने जनतेला सुरळीत वीज पुरवठा केला. असे असताना महावितरणकडून नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले दिल्याचा आरोप आहे. याविरोधात सध्या मनसेसह भाजपनेही विरोधाचे अस्र उगारत वीज बिलांची होळी केली. असे असताना सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी तुम्ही देखील “कोरोना योद्धा” आहात असे सांगत गुलाब पुष्प देऊन महावितरण कर्मचार्यांचा सन्मान केला.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशासह राज्यात थैमान सुरु आहे. यातच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याबाबत महाराष्ट्रासह इतर राज्यांनी लाॅकडाऊन करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू करण्याचे सुतोवाच केले आहे. परंतु, मार्च महिन्यात संबंध देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून लॉकडाऊन केले होते. या काळात पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी, शेतकरी, ग्रामपंचायत कर्मचारी, कोव्हीड योध्दे, शिक्षक, बस कर्मचारी, अशांनी कोव्हीड काळात आपल्याला मदत केल्याचे दिसले.
परंतु, भर उन्हाळ्यात हा लॉकडाऊन केला गेला होता. या परिस्थितीत आपल्याला फॅन, कुलर व एसीची गार हवा मिळाली. मनोरंजनासाठी मोबाईल, टीव्ही व रेडीओ असे उपकरणे वापरली.
थंडगार पाण्यासाठी फ्रिजरचा पण वापर करता आला. हे शक्य झाले ते फक्त एक महावितरण कर्मचाऱ्यांमुळे. म्हणून या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आल्याचे देवेंद्र काजळे यांनी सांगितले.
यावेळी पिंपळगाव बसवंत परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, नितीन पगारे, भाग्यश्री आव्हाड, चंद्रशेखर निकम, अतुल चौधरी, सहाय्यक अभियंता विकास नवसारे, गायत्री गावित, अमित मत्सागर, महेश वाळुंज, अमोल कोळी, सहाय्यक लेखापाल बाबर कादरी, सुजाता खैरनार, के. एस. साळुंके, गोरख गायकवाड, आनंद गांगुर्डे, कृष्णा साळुंके यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
जनतेला सेवा देणे आमचे कर्तव्यच
सर्व वीज ग्राहकांना सेवा देणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्या नियमाचे आम्ही काटेकोरपणे पालन केले. परंतु, माझी सर्व वीज ग्राहकांना विनंती आहे की, आपण सुद्धा आपले बील भरून आम्हाला सहकार्य करावे.
– एकनाथ कापसे, उप अभियंता, पिंपळगाव बसवंत
यावेळी विश्वास पाटील, मनोज मोरे, मा.सरपंच अशोक घुगे, मा.सरपंच श्रीनिवास गवळी,देवेंद्र काजळे, लक्ष्मण वलवे, विजय उगले, सोमेश्वर मोरे, वैभव केणे, सदस्य सुरेश पगारे, चंद्रशेखर हिरे, भरत पटेल आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button