Bollywood

Bollywood:Viral: आलिया भट्ट ला घरबसल्या चांगल्या भूमिका पदरात पडतात… ऐश्वर्या रॉय ची आलियावर सडकून टीका.. व्हिडिओ व्हायरल.. पहा व्हिडिओ…

Bollywood:Viral: आलिया भट्ट ला घरबसल्या चांगल्या भूमिका पदरात पडतात… ऐश्वर्या रॉय ची आलियावर सडकून टीका.. व्हिडिओ व्हायरल.. पहा व्हिडिओ…करण जोहरने त्याच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून आलिया भट्टला लाँच केलं होतं. त्यानंतर तिने ‘हायवे’, ‘टू स्टेट्स’, ‘डिअर जिंदगी’, ‘राजी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘डार्लिंग्स’, ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरून नेहमीच चर्चा होते. अनेकदा ही चर्चा इतकी वाढते की त्यावरून वाद निर्माण होतात. फिल्म इंडस्ट्रीत आणि सर्वसामान्यांमध्ये ही बाब जगजाहीर आहे की कलाकारांच्या मुलांना म्हणजेच स्टार किड्सना सहज संधी मिळतात. याउलट ज्यांचा कोणी गॉडफादर नसतो, त्यांना बराच संघर्ष करावा लागतो. अशाच गोष्टीवरून अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनने खदखद व्यक्त केली होती. तेसुद्धा अभिनेत्री आलिया भट्टबद्दल. आलियाला करिअरच्या सुरुवातीपासूनच करण जोहरने खूप पाठिंबा दिला आणि त्यामुळे चांगल्या संधी थेट तिच्या पदरात पडतात, असं ऐश्वर्या म्हणाली होती.
ऐश्वर्याचा हा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळेच आलिया भट्टविरोधातील तिचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. स्टारकिड असल्याने आलियाला मिळणाऱ्या फायद्यांवर ऐश्वर्याने मत व्यक्त केलं होतं. 2018 मध्ये ‘फन्ने खान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती याविषयी बोलली होती.
काय म्हणाली होती ऐश्वर्या?
आलियाला मिळणाऱ्या सुवर्णसंधींबद्दल ऐश्वर्या म्हणाली होती, “मी तिलासुद्धा म्हटलं होतं की तुझ्यासाठी ही शानदार बाब आहे. ज्या पद्धतीचं समर्थन तिला करण जोहरने सुरुवातीपासूनच दिलं आहे आणि एका आरामदायी वातावरणात तुम्हाला संधी मिळाल्या आहेत. यावरून तुम्हाला माहीत असतं की हे कठीण नाही. या गोष्टी तुम्हाला फार काळापासून मिळत आहेत. एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आपल्यासमोर फक्त चांगल्या संधी आहेत, ती गोष्ट खूप खास असते.”

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button