Bollywood

Bollywood: शाहरुख थुंकला की फुंकला..! जबरदस्त वाद..!पहा नेमका प्रकार..!

Bollywood: शाहरुख थुंकला की फुंकला..! जबरदस्त वाद..!पहा नेमका प्रकार..!

मुंबई काल भारतरत्न जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांचं पार्थिव प्रभूकुंज ह्या त्यांच्या निवासस्थानावरून शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारासाठी आणलं गेलं. अंत्यसंस्कारांपूर्वी ते काही काळ दर्शनासाठी ठेवलं गेलं होतं.

यावेळी शाहरुख खान आपली मॅनेजर पूजा ददलानी हिच्यासह शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होता. दीदींना श्रद्धांजली तसंच फुलं, हार वाहण्यासाठी लोक रांगेत येत होते आणि चौथऱ्यावर चढून पार्थिवाजवळ येऊन आपली श्रद्धांजली वाहत होते.

त्याप्रमाणे शाहरुख आणि पूजा चौथऱ्यावर चढल्यानंतर शाहरुखने पुष्पचक्र वाहिलं. शाहरुखने त्यानंतर दुवा पढायला सुरुवात केली, त्यावेळी त्याचा मास्क त्याच्या चेहऱ्यावर होता. दुवा पढून झाल्यानंतर त्याने मास्क खाली केला आणि तो पुढे वाकला. त्यावेळी त्याने फुंकर मारली. यानंतर शाहरुख आणि पूजा दोघांनी लतादीदींच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली.

प्रदक्षिणा पूर्ण करून शाहरुखने आधी हात जोडून आणि मग वाकून पार्थिवाला नमस्कार केला आणि मग ते खाली उतरले.

शाहरुखने मास्क काढून जे केलं ते काय होतं आणि ते का केलं असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.

तर मुस्लिम धर्मात ही पारंपारिक पद्धत आहे. शाहरुख खानने त्याच्या धर्माच्या पद्धतीने दुवा केली आहे. या दुवामध्ये अल्लाकडे प्रार्थना केली जाते की, चांगल्या माणसाला जन्नत हासिल (स्वर्गप्राप्ती) व्हावी. मरणोत्तर त्यांचं जीवन चांगलं असावं अशी ती प्रार्थना असते. तीच भावना शाहरुखने व्यक्त केली आहे. फुंकर मारणं म्हणजे आतला आवाज पोहचवणं, त्याच्याशी एकरुप होणं हा भाव त्याच्यात आहे.

अनेक कट्टरतावादी मुस्लिम बिगर मुस्लिमांसाठी अशी दुवा मागणं इस्लाम विरोधी मानतात. उदारमतवादी मुस्लिमांना याबाबत काही वाटत नाही. शाहरुखने जे काही केलं ते मानवतावादी दृष्टिकोनातून केलं आहे. यातून गैर अर्थ काढणं बरोबर नाही. शाहरुखच्या दुवा मागण्याला थुकणं म्हणणं हा मुस्लिम समाजाला बदनाम करण्याच्या षड्यंत्राचा भाग आहे. निर्मळ भावनेने केलेल्या दुवाला धार्मिक चष्म्यातून पाहून त्यातून धर्मद्वेष पसरवणं ही संकुचित मानसिकता आहे.

शाहरुख सोबतची महिला कोण..?

शाहरुख खान हा मुस्लिम आणि त्याची पत्नी गौरी ही हिंदू आहे. शाहरुख दुवा करताना आणि त्याच्याशेजारची महिला प्रार्थना करताना दिसत असल्याने अनेकांनी भिन्न धर्माचे हे पती-पत्नी धार्मिक सलोख्याचं प्रतीक असल्याचं म्हणताना दिसले. त्यांनी स्वतःच नंतर ही चूक दुरूस्तही केली. पण इतर अनेक लोक ही महिला गौरी खान असल्याचं म्हणताना दिसले. पण शाहरुख बरोबर पत्नी गौरी नसून शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button