Bollywood

Bollywood: विवाहित पुरुष आणि प्रेम….रेखाच धक्कादायक उत्तर..!

Bollywood: विवाहित पुरुष आणि प्रेम….रेखाच धक्कादायक उत्तर..!

अभिनेत्री रेखा यांनी रुपेरी पडदा गाजवला. हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण, तुम्हाला माहितीये का, याच रेखा त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र बराच संघर्ष केला.
चित्रपटांतून त्यांना साथ देणारे अनेक कलाकार दिसले. पण, आयुष्याच्या पटावर मात्र त्यांना हक्काचा असा जोडीदार भेटलाच नाही.
जे भेटले त्यांच्याशी रेखा यांचं नातं पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशीही रेखा यांचं नाव जोडलं गेलं.
बऱ्याच मुलाखती, टॉक शो किंबहुना पुरस्कार सोहळ्यांमध्येही रेखा आणि अमाताभ बच्चन यांच्यात काहीतरी नातं नक्कीच असावं याची खात्री करुन देणारे क्षण अनेकदा पाहायला मिळाले आहेत.
आता म्हणे रेखा यांनी इंडियन आइडल (Indian Idol) या रिअॅलिटी शोमध्ये विवाहित पुरुषावर असणाऱ्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्या प्रश्चानं उत्तर लक्ष देण्याजोगं होतं.
सूत्रसंचालक जय भानुशाली यानं तुम्ही कधी कोणा महिलेला विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्याचं पाहिलं आहे का?
या प्रश्नाचं उत्तर देत, ‘मला विचारा ना ….’ असा सूर आळवत उत्तर दिलं. प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्या काहीशा गोंधळल्या. जे कॅमेरामद्ये टीपण्यात आलं.
रेखा यांच्या या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि त्यांच्या अव्यक्त नात्याला वाचा फुटली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button