Pune

आदिवासी क्रांती संघटना,असाणे मार्फत गुणवंत परिक्षार्थींचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

आदिवासी क्रांती संघटना,असाणे मार्फत गुणवंत परिक्षार्थींचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

दिलीप आंबवणे पुणे

पुणे : आदिवासी क्रांती संघटनेमार्फत घेण्यात आलेल्या सराव लेखी परीक्षेतील गुणवंत परिक्षार्थींचा आणि असाणे गावातील दोन्हीही माध्यमिक महाविद्यालयातील मागील २०१९-२० या शैक्षणिक वर्षांत दहावी इयत्तेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विध्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे सरपंच मिराबाई शंकर गभाले यांनी भूषविले. मा.सरपंच विनायक देवराम ढवळे, मा.तंटामुक्ती अध्यक्ष पुनाजी रामजी करवंदे,ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दत्ता रामा गभाले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन हे आदिवासी क्रांती संघटनेच्या सदस्यांनी केले होते.
असाणे केंद्र मध्ये अमोल कृष्णा असवले- ६२ गुण, योगेश विठ्ठल असवले- ५६ गुण, बाबुराव सखाराम आंबवणे- ५५ गुण आणि तळेघर केंद्र यामध्ये निलेश शिवराम मोहंडुळे- ७५ गुण, गणेश पांडुरंग भोईर- ६४ गुण, सचिन यमाजी आंबेकर- ६३ गुण मिळाले.
तसेच शासकीय आश्रम शाळा, असाणे या शाळेत मागील २०१९-२०या शैक्षणिक वर्षातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेले तीन विद्यार्थी निलेश विलास भोईर- ६६.४०टक्के तेजस्विनी बबन गभाले- ६५.२०टक्के उषा बारकू बांबळे- ६४.८० टक्के न्यू इंग्लिश स्कूल,असाणे या शाळेत मागील २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी अमोल सुनील गभाले- ८४ टक्के रामचंद्र विजय असवले- ७४.४०टक्के, ऋतिक भाऊ जाधव- ६२.८०टक्के ह्या सर्व विध्यार्थ्यांना आदिवासी क्रांती संघटनेमार्फत पुस्तकांचे संच आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियमांचे पालन करून मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button