Ahamdanagar

?️ Big Breaking.. पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा मनमानी कारभार थांबवा.. अन्यथा आपत्ती काळात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा

?️ Big Breaking.. पारनेर च्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा मनमानी कारभार थांबवा..अन्यथा आपत्ती काळात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा

सुनील नजन

पारनेर येथील तहसिलदार श्रीम. ज्योती देवरे यांचे मनमानी वागणुकी विरोधात
समस्त महसुल कर्मचारी व तलाठी/मंडळअधिकारी, तालुका पारनेर, जिल्हा- अहमदनगर यांनी तक्रार दि 17 मे 2020 रोजी केली असून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उपरोक्त विषयी विनंतीपुर्वक निवेदन सादर करतो की, आम्ही खाली सह्या करणारे सर्व पारनेर तालुक्यात तहसिलदार श्रीम, ज्योती देवरे यांचे अधिनस्त काम करत आहोत. सध्य परिस्थितीत कोविड-१९ च्या अनुषंगाने सर्वच महसूल
कर्मचारी/तलाठी/मंडळअधिकारी/कोतवाल अत्यंत सचोटीने व कर्तव्यपरायणतेने आपले कर्तव्य रात्रंदिवस पार पाडत आहेत.
तालुक्यातील सर्व व्यवस्था हे कर्मचारी समर्थपणे हाताळत आहेत. प्रसंगी स्वखर्चाने सर्व व्यवस्था करत आहेत. असे असताना
तहसिलदार पारनेर या कर्मचाऱ्यांना अत्यंत खालच्या स्तराची व अपमानास्पद वागणूक देऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम करत आहेत. वारंवार कारवाई करण्याच्या धमक्या देऊन व एका एकाला बघून घेईल अश्या प्रकारच्या धमक्या देऊन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली आहे. तसेच राजकीय पुढारी,नागरिक, कार्यालयातील सर्व कर्मचारी यांचेसमक्ष कर्मचाऱ्याच्या वयाचा/ पदाचा मुलाहिजा न करता ‘लाजा वाटत नाहीत का/बांगड्या भरा’ अशा प्रकारची शिवराळ व
अशासकीय भाषेचा वारंवार सर्रास वापर केला जात आहे.

?? याबाबत आम्ही खालीलप्रमाणे काही मुद्दे आपले निदर्शनास आणून देऊ इच्छितो:

१. विधानसभा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआगोबरपासून पारनेर तहसिलदार पदी श्रीम ज्योती देवरे या रुजू
शाल्या आहेत तेव्हापासून अतिशय नियोजनशून्य काम करून कर्मचारी यांना वेठीस धरले जात आहे. तसेच कर्मचारी यांना निवडणुकीदरम्यान त्यांचे वेतनातून खर्च करण्यास भाग पाडले व त्याचे आजतागायत कर्मचारी यांना भुगतान केलेले नाही. आम्ही त्यांची मागणी केली असता बघून घेण्याची/दप्तर तपासणी करून निलंबित
करण्याची धमकी दिली जात आहे.

२. तालुक्यातील राजकीय पुढारी अथवा नागरिक काही काम घेऊन आल्यास त्याची कोणतीही शहानिशा न करता
कर्मचारी यांची बाजू ऐकून न घेता त्यांचेसमोरच कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.

३. मा. शासनाने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कमीतकमी कर्मचारी उपस्थित ठेऊन काम चालविणेबाबत आदेशित केलेले असताना देखील तहसिलदार पारनेर यांनी १००% कर्मचारी यांना त्यांच्या वयाचा, आजारपणाचा विचार न करता कार्यालयात उपस्थित राहण्यास भाग पाडले. परंतु त्यांच्या आरोग्याच्या
दृष्टीने कुठलीही खबरदारी घेतली नाही. मा. जिल्हाधिकारी साहेब यांचेमार्फत याबाबत उपाययोजना करणेकामी
निधी उपलब्ध झालेला असताना देखील एकाही कर्मचाऱ्यास एकही मास्क, सॅनिटायझर अथवा इतर सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून दिले नाही. इतकेच नाही तर कान्हूर पठार येथील एका दानशूर व्यक्तीने कर्मचाऱ्यासाठी मास्क उपलब्ध करून दिले होते ते देखील वाटप केले नाही. तसेच मा. खासदार श्री विखे साहेब यांचेकडून उपलब्ध झालेले मास्क व सॅनिटायझर देखील एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात काही कर्मचाऱ्यांना वाटप केले आहे ते देखील
सर्व कर्मचा-यांना वाटप केलेले नाही. तसेच तहसिलदार पारनेर यांनी तलाठी मंडळअधिकारी यांना दिनांक २८ मार्च २०२० रोजी व्हाटसएप ग्रुप वर संदेश टाकून घरच्यांना विमा पॉलीसी चे कागद दाखवून ठेऊन गावी जाणे बाबत सूचित केले आहे. यावरून तहसिलदार पारनेर यांना कर्मचाऱ्यांच्या जिविताचे काही घेणेदेणे नाही असे
आमचे ठाम मत झालेले आहे.

४. विधानसभा निवडणूकीपासून ते आजतागायत कुठल्याही प्रकारच्या बैठकीचे पूर्वनियोजन न करता अर्धा तास अगोदर व्हाटसऍप ग्रुप वर संदेश टाकून तत्काळ उपस्थित राहणे बाबत आदेशित केले जाते. बैठकीस येण्यास उशीर
झाल्यास किंवा अनुपस्थित राहिल्यास कारवाई करण्याची धमकी दिली जात आहे. अशा बैठका सायंकाळी उशिरा सुरु करुन जाणीवपूर्वक उशिरा संपविल्या जातात व महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबण्यास भाग पाडले जाते व कोणी महिला घरी जाणेबाबत विचारणा करण्यास गेल्यास मी देखील महिला आहे त्यामुळे
तुम्हाला सुटका नाही अशा प्रकारे उत्तर दिले जाते.

५. कोविड-१९ च्या काळात अनेक तलाठी/मंडळअधिकारी यांनी निवारागृहे चालविताना पगारातून चर्च केला आहे याबाबत तहसिलदार यांचे स्तरावरून कुठलीही मदत मिळाली नाही. तलाठी/मंडळअधिकारी यांनी त्यांचे स्तरावर
गावी विनंत्या करून, वर्गणी करून प्रसंगी स्वतः च्या पगारातून खर्च करून सदर निवारागृहे चालविली आहेत.

याबाबत तहसिलदार पारनेर यांना विचारणा केल्यास कोरोना संपल्यानंतर एका एकाला बघून घेण्याची धमकी देत आहे. याबाबत शासनाने काही निधी उपलब्ध करून दिला असल्यास त्याची चौकशी व्हावी.

६. कृषी गणना २०१९ चे मानधन आलेले असताना व इतर तालुक्यात त्याचे वाटप केले असताना पारनेर तालुक्यात अद्यापपर्यंत दिले गेले नाही.

७. कार्यालयीन चर्च निधीतून सन २०२० साली साधी टाचणी देखील तहसिलदार पारनेर यांनी कर्मचा-यांना पुरविली नसून सर्व कर्मचारी स्वतः च्या पगारातून खर्च करीत आहेत. तसेच बरचसे आदेश हे कर्मचाऱ्यांना पत्रकार अथवा
प्रशासनाच्या बाहेरील व्यक्ती यांचेमार्फत मिळत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

८. कोरोनाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाहन व बाहनचालक यांची सेवा तहसिल कार्यालय पारनेर येथे वर्ग करण्यात आली होती. त्याचे वाहनचालक श्री आबा औटी यांना किरकोळ कारणावरून अपमानास्पद
वागणूक देऊन त्यांचे कानशिलात लागाविली होती व त्यांना माझ्या नादी लागू नको अन्यथा तुला संपवून टाकीन अशी धमकी दिली होती. याबाबत थी आबा औटी यांनी पारनेर पोलीस स्टेशनला तशी लेखी तक्रार देखील केली
होती. तसेच तालुक्यातील तलाठी कर्मचारी सजेतील एका गावात उपस्थित असतानादेखील दुसऱ्या गावात जाऊन अनुपस्थित असलेबाबत पंचनामा केला जातो. अशा प्रकारे कर्मचारी यांना सूटबुद्धीने बागवून दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी प्रचंड मानसिक तणावाखाली काम करत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे पारीवारीक जीवन देखील उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील एखादा महसूल कर्मचारी किंवा त्यांचे परीवारातील एखाद्या सदस्यास काही दुर्घटना झाल्यास त्यास
पूर्णपणे धीम, ज्योती देवरे या जबाबदार असतील.

९. कोविड-१९ सुरु होण्यापूर्वी देखील ७/१२ संगणकीकरणाचे काम असो वा वसुली त्यामध्ये ऑनलाईन मान्यता देणे
असो वा एखादा आदेश पारीत करणे असो तहसिलदार पारनेर जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून विलंब करत होत्या व याबाबतीत वरिष्ठ स्तरावरून आढावा झाल्यानंतर तलाठी/मंडळअधिकारी यांचेवर जबाबदारी झटकून कारवाई करण्याची धमकी देतात.

१०. सध्याच्या परिस्थितीत तहसिलदार पारनेर या राजकीय दृष्ट्या सक्रीय असल्यासारख्या वागत आहेत. त्याचे बरे वाईट परीणामास खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी/तलाठी/मंडळअधिकारी यांची पारनेर
तहसिलदार ज्योती देवरे यांचे अधिपत्याखाली काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही.

सध्या आपत्ती काळ असल्याने आम्ही सर्वजण आजतागायत हे निमूटपणे सहन करीत होतो परंतु हे सर्व आता असहनीय झाले असल्याने
आम्हास आपल्यासमोर आपली व्यथा घेऊन येण्याशिवाय मार्गच शिल्लक राहिला नाही. तरी माननीय महोदयांस
विनंती आहे की आपण वरील बाबींचा विचार करून आम्हास योग्य तो न्याय देण्याची कृपा करावी, आम्हास योग्य तो
न्याय न मिळाल्यास तालुक्यातील सर्व कर्मचारी सामुहिक रजा आंदोलन/काम बंद आंदोलन अथवा इतर प्रकारे आंदोलन
करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे साहेबांनी आम्हास योग्य तो न्याय देऊन अशा प्रकारे आंदोलन करण्यापासून
परावृत्त करावे अन्यथा याप्रकारे आंदोलन केल्याने जनतेची गैरसोय होईल व याची सर्व जबाबदारी शासनावर राहील अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रार अर्जावर सर्व महसूल ,पुरवठा अधिकारी, कर्मचारी यांच्या सह्या आहेत…सदर तक्रार अर्जाच्या प्रति खालील प्रमाणे पाठविण्यात आल्या आहेत…

१. मा.मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य
२. मा.महसूलमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य
३. मा.विभागीय आयुक्त साहेब,
नाशिक विभाग, नाशिक
४. मा.जिल्हाधिकारी साहेब,
अहमदनगर
५. मा.उपविभागीय अधिकारी साहेब,
श्रीगोंदा-पारनेर उपविभाग, भाग-अहमदनगर
६. मा.अध्यक्ष महोदय,
महसुल कर्मचारी संघटना, अहमदनगर
७. मा. अध्यक्ष महोदय,तलाठी संघटना पारनेर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button