India

?Big Breaking.. जेनयू चे माजी विद्यार्थी उमर खालिद यांना अटक.. ‘अमित’ प्रणीत कमळाच्या तालावर नाचणाऱ्या पोलिसांची कारवाई…

?Big Breaking.. जेनयू चे माजी विद्यार्थी उमर खालिद यांना अटक.. ‘अमित’ प्रणीत कमळाच्या तालावर नाचणाऱ्या पोलिसांची कारवाई…

नवी दिल्ली

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते उमर खालिद यांना ईशान्य दिल्ली दंगलीतील त्याच्या बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.दिल्ली पोलिसांच्या विशेष दलाने 11 तासांच्या चौकशीनंतर उमर खालिद यांना अटक केली. सोमवारी त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले.

दिल्ली येथील दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून खालिदकडे काही तास चौकशी केली गेली. यापूर्वी दंगलीसंबंधित आणखी एका प्रकरणात त्याच्यावर कठोर बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी दंगली मागील कथित कट रचल्याबद्दल दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही त्यांची चौकशी केली होती.यावेळी त्यांचा मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला. नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे समर्थक आणि कायद्याविरोधात समर्थक यांच्यात झालेल्या हिंसाचारानंतर ईशान्य दिल्लीत जातीय संघर्ष सुरू झाला होता.

आतापर्यंत पोलिसांनी 751 प्रकरणात 1,575 लोकांना अटक केली आहे. दंगली संबंधित प्रकरणांमध्ये 250 हून अधिक दोषारोपपत्र दाखल केले गेले आहेत, ज्यात 1,153 आरोपींवर दोषारोप ठेवले आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात कायदा समर्थक पैकी एकाही व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. मात्र या कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांना मात्र अँटी नॅशनल असा आरोप लावत तुकडा गॅंग चे लेबल लावत दिल्लीतील कठपुतली पोलीस सध्या ‘अमित’प्रणित कमळाच्या तालावर नाचताना दिसून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button