Nashik

भिम फेस्टवल सातपूर कॉलनी येथे मोठ्या उत्साहात साजरा

भिम फेस्टवल सातपूर कॉलनी येथे मोठ्या उत्साहात साजरा

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक:- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त जिजामाता मैदान सातपूर कॉलनी येथे भव्य भिम फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते.
भिम फेस्टिवल स्वागत समिती व जेतवन बुद्ध विहार सातपूर कॉलनी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
व बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक इंडियन आयडॉल फेम -मी होणार सुपरस्टार संतोष जी जोंधळे यांच्या भिम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सातपुर शहर व परिसरातीलमहिला,युवक,युवती,जेष्ठ, नागरिक प्रचंड संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते.
भिम फेस्टिवल च्या अध्यक्षा कमल ताई महिरे,कार्याध्यक्षा रिता ताई जगताप,यांनी आलेल्या मान्यवरांचे शाल पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी भिम फेस्टिवल समितीच्या वतीने माजी सभापती सलीम मामा शेख,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे,संकल्पित रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश जी पगारे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज जी भालेराव(सातपूर पोलीस स्टेशन),सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके,मा.नगरसेवक योगेश भाऊ शेवरे,गीता ताई जाधव, योगेश गांगुर्डे,आदेश पगारे,शिवाजी काळे,संदेश पगारे,जेष्ठ सदस्य जेतवन बुद्ध विहार,विजय अहिरे,प्रणिल धनधार,पी.एस.आय अश्विनी उबाळे
या प्रमुख मान्यवरांना “संविधान प्रत” देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमा प्रसंगी एम.के.पॅरामाउंट करियर अकॅडमी च्या वतीने सेंट्रल पोलीस कॉन्स्टेबल झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

भिम फेस्टिवल सातपूर कॉलनी 2023 च्या यशस्वीतेसाठी
बिपिन कटारे,प्रशांत जगताप,वैभव महिरे,प्रतीक पगारे,दीपक निळे,प्रशांत धिवरे,भारत भालेराव,राहुल गायकवाड,कुंदन पगारे,सतीश केदारे,कुंदन जगताप,योगेश पानपाटील,अजिंक्य जाधव,निशांत शेट्टी,मंगेश जगताप, अरुण पाटील,अविनाश गायकवाड,उमेश जगताप,बंटी लभडे,प्रफुल कटारे,अतुल गोरे,विकी संसारे,अमित पाटीलयांनी परिश्रम घेतले.
भव्य भिम फेस्टिवल सातपूर कॉलनीतील कार्यक्रमास संपूर्ण सातपूर शहरातून प्रमुख मान्यवर देखील उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button