Mumbai

राज्य सरकारची लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा..!पहा काय आहे मिशन कवच कुंडल..!उद्या पासून मोहीम होईल सुरू..!

राज्य सरकारची लसीकरणासंदर्भात मोठी घोषणा..!पहा काय आहे मिशन कवच कुंडल..!उद्या पासून मोहीम होईल सुरू..!

मुंबई राज्यात करोनाची दुसरी लाट कमी होत आहे.तरी देखील सावधानता बाळगणे आवश्यक आहे ह्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू केल्या आहेत. तिसरी लाट येऊ नये आणि करोना पूर्णपणे हद्दपार व्हावा या अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होईल ह्या साठी ‘मिशन कवच कुंडल’ या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. त्यानुसार उद्या ८ ऑक्टोबरपासून ते १४ ऑक्टोबर असे सात दिवस राज्यात ‘मिशन कवच कुंडल’ राबवण्यात येणार आहे. त्या अंतर्गत राज्यात दररोज किमान १५ लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात येईल. येत्या दसऱ्यापर्यंत देशात १०० कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलं आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारला हे लक्ष्य गाठता येईल. लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र आजही कमी पडलेला नाही. यापुढंही तो कमी पडू नये हाच सरकारचा प्रयत्न आहे असं टोपे म्हणाले.

कोविड लसीच्या उपलब्धतेची परिस्थिती आता बदलली आहे. पूर्वीसारखा लसींचा तुटवडा नाही. आज या क्षणाला राज्याकडं लसीचे जवळपास ७५ लाख डोस आहेत. आणखी २५ लाख डोस आज मिळणार आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button