sawada

सावद्यात खंडेराव मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न..

सावद्यात खंडेराव मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न..

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे आज खंडेराव मंदिर देवस्थान येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.

सदरील खंडोबा देवस्थान जागृत असून येथे भाविकांचे नवस पूर्ण होतात. तसेच येथे बानु देवी यांचे मंदिर असून दरवर्षी चंपाषष्टीला येथे यात्रा देखील भरते तरी या ठिकाणी नवस फेडण्यासाठी बाहेरून येणारे भाविकांना मोठा त्रास होत होता. ही बाब शहरातील नागरिकांनी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. तात्काळ खंडोबा देवस्थान येथे सभामंडपाची सुविधा व्हावी यासाठी आमदारांनी जिल्हा नियोजन समिती मंडळाचे अध्यक्ष पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी सभामंडपासाठी निधी मंजूर करून दिला. परिणामी आज दि.२४/१०/२०२१ रोजी सकाळी ९-०० वाजता खंडोबा देवस्थान येथे सभामंडपाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगर चे लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी संख्येने भाविक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button