Mumbai

जाणून घ्या कधी होईल 11 वी ची सीईटी..ही असेल तारीख..

जाणून घ्या कधी होईल 11 वी ची सीईटी..ही असेल तारीख..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे.

या दिवशी होईल अकरावी सीईटी परीक्षा?

दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी द्यावी लागणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असणार आहे.

यंदा अकरावीचे प्रवेश दोन टप्प्यात होणार आहे. जे विद्यार्थी सीईटी परीक्षा देतील त्यांचे प्रवेश प्राधान्याने पहिल्या टप्प्यात होतील.

दुसऱ्या टप्प्यात उर्वरित प्रवेश जागांवर दहावीच्या निकालाच्या आधारे प्रवेश होतील.

अकरावी सीईटीची परीक्षा साधारण 21 ऑगस्टला होऊ शकते. त्यादृष्टीने बोर्डाची पूर्व तयारी सुरू आहे. येत्या आठवड्यापासून परीक्षेची प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरावा लागेल. तसंच परीक्षा देण्याबाबत विचारणा करण्यात येईल.

ही परीक्षा सीबीएसई आणि आयसीएसई या शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठीही खुली असणार आहे.

विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी सीईटीची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय. यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलंय. त्या म्हणाल्या, “सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल.”

11 वी प्रवेशाबाबत नेमका निर्णय काय?

  • सीईटीसाठी एक समिती स्थापन
  • सीईटी राज्यातील सर्व महामंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी असेल
  • 11 वी प्रवेशासाठीची सीईटी विद्यार्थ्यांना ऐच्छिक, कोणतंही बंधन नाही
  • परीक्षा 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार
  • प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न असणार
  • 100 गुणांची बहुपर्यायीपरीक्षा, 2 तास वेळ, ऑफलाईन परीक्षा
  • 10 वीच्या निकाल 15 जुलै दरम्यान लागणार असल्यानं ही सीईटी त्यानंतर 2 आठवड्यांमध्ये म्हणजे जुलै अखेर होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button