Nashik

नाशिक मध्ये नियोजित नमामि गोदा,लॉजिस्टीक पार्क व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणे या कामांचा भुमिपुजन समारंभ

नाशिक मध्ये नियोजित नमामि गोदा,लॉजिस्टीक पार्क व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणे या कामांचा भुमिपुजन समारंभ

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक=नाशिक मध्ये नियोजित नमामि गोदा,लाजिस्टीक पार्क व पर्यटक यांच्या साठी मदत केंद्र उभारणे भुमीपुजन सोहळ्याला मा.केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.श्री.गजेंद्रसिंहजी शेखावत यांनी नाशिक शहरासाठी नमामि गोदा प्रकल्पास दिलेल्या मान्यतेनुसार नियोजित नमामि गोदा प्रकल्प ,लॉजिस्टीक पार्क व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणे कामाचा भुमिपुजन समारंभ दि.13/3/2022 रोजी मा.केंद्रीय रेल्वेमंत्री ना.श्री.रावसाहेब दानवे पाटील यांचे शुभहस्ते व नाशिकचे प्रभारी मा.आमदार श्री गिरीषभाऊ महाजन,सहप्रभारी मा.आमदार श्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत दुपारी 12.30 वा.लॉजिस्टीक पार्क –ट्रक टर्मिनल आडगांव, सायंकाळी 6.00 वा नमामि गोदा प्रकल्प व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणे- रामकुंड,पंचवटी येथे नाशिकमधील सर्व साधुमहंत समवेत संपन्न होणार आहे.

तसेच आडगांव शिवारामधील मनपा मालकीचे ट्रक टर्मिनलच्या 58 एकर जागेमध्ये लॉजिस्टीक पार्कचा तसेच नाशिक शहराची ओळख ही तिर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण भारतभर व इतर देशातही आहे. दर बारा वर्षांनी येणा-या सिंहस्थ कुंभ मेळयामुळे देखील नाशिक शहराला पर्यटनाचे वैभव प्राप्त झाले आहे.त्या अनुषंगाने नाशिक शहरात भारतातील इतर राज्यातुन व परदेशातुन देखील पर्यटनासाठी पर्यटक येत असतात. येणा-या पर्यटकांना नाशिक शहराची एैतिहासिक, पौराणीक व अध्यात्मिकता बाबतची ओळख व्हावी तसेच पर्यटनाचे दृष्टीने नाशिक शहराचे नांव जागतीक पातळीवर उंचावणे करीता पर्यटकांना योग्य माहिती व मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता 1) नाशिकरोड रेल्वे स्टेशन जवळ 2) गंगाघाट रामकुंड येथे पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उभारणेच्या कामाचा भुमिपुजन समारंभ भुमिपुजन समारंभ मा.केंद्रीय रेल्वेमंत्री ना.श्री.रावसाहेब दानवे पाटील यांचे शुभहस्ते होणार आहे. या प्रकल्पांची मुहुर्तमेढ या निमित्ताने रोवली जाणार असून गेल्या दिड वर्षापासून या बाबतीतील नाशिककरांची प्रतिक्षा संपणार आहे.

या सर्व कार्यक्रमास नाशिककरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापौर या नात्याने श्री सतिशनाना कुलकर्णी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button