Nashik

अॅड . जयंत जायभावे यांना रोटरीचा ‘ नाशिक भूषण ‘ पुरस्कार..अभिनंदनाचा वर्षाव

अॅड . जयंत जायभावे यांना रोटरीचा ‘ नाशिक भूषण ‘ पुरस्कार ,अभिनंदनाचा वर्षाव,

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या नाशिक भूषण पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ विधितंज्ञ श्री जयंत जायभावे यांची निवड करण्यात आली आहे . रविवारी सायंकाळी सहा वाजता या पुरस्काराचे वितरण न्या . अरूण ढवळे यांच्या हस्ते करण्यातआले आहे . रोटरी क्लबतर्फे जन्मभूमी आणि कर्मभूमी नाशिक असणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात नाशिकचे नांव उज्वल करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आले आहे अॅड. जयंत जायभावे यांनी महाराष्ट्र – गोवा वकील संघाचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष प्रतिनिधीत्व केले आहे . वकील कायद्यातील प्रस्तावित तरतुदी तसेच मसुद्यासाठी कार्यरत समितीत समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे . सामान्य जनतेला जलद न्याय मिळावा , यासाठी त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम आणि संकल्पना मांडल्या . पैशांअभावीअनेक तरूण वकील कायद्याचेअभ्यास पुस्तक घेऊन अभ्यास करू शकत नाहीत . त्यांना दावे लढण्यास मदत व्हावी म्हणून श्री जयंत जायभावे यांनी नाशिकमध्ये भारतातील पहिले वाचनालय सुरू केले . पुढे त्याचे अनुकरण देशात होऊन अनेक ठिकाणीअशी वाचनालये सुरवात झाली . करोनामुळे न्यायालयीन कामकाज प्रभावित झाले आहे . य काळात पक्षकारांना त्रास होता न्यायालयाचे कामकाज सुरू रहावे , यासाठी नाशिकमध्ये न्यायालय अस्तित्वात येणार आहे.य प्रकल्पात अॅड . जायभावे यांच महत्वाचा सहभाग आहे . यंदाच्या पुरस्कारासाठी रोटरी क्लबने अॅड . जायभावे यांची निवड केल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष अॅड . मनिष चिंधडे , सचिव डॉ . श्रीय कुलकर्णी , पुरस्कार निवड समितीचे रवी महादेवकर यांनी दिली . रविवारी सायंकाळी सहा वाजता रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या फेसबुक पानावरून पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button