Akkalkot

खबरदार तोंडाला मास्क न लावल्यास होणार ₹ 200/- रुपये दंड- तहसिलदार अंजली मरोड

खबरदार तोंडाला मास्क न लावल्यास होणार ₹ 200/- रुपये दंड- तहसिलदार अंजली मरोड

प्रतिनिधी कृष्णा यादव, अक्कलकोट

अक्कलकोट सद्यस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यात कोरोना covid-19 या विषयांच्या सामाजिक संसर्गात सुरुवात झाली असून या विषयांच्या संसर्गाची रुग्ण देखील आढळून आलेले आहेत. त्यातील 6 संसर्ग बाधित व्यक्तींचा मृत्यू देखील झालेला आहे अक्कलकोट तालुक्यांमध्ये सोलापूर पुणे मुंबई व अन्य शहराच्या ठिकाणाहून कोरोना covid-19 या विषाणूचा संसर्ग रुग्ण आढळून आलेले आहेत अशा शहरातून आलेल्या नागरिकामध्ये covid-19 या विषाणूच्या संसर्गाच्या व्यक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अक्कलकोटमध्ये तालुक्यामध्ये संचारबंदी असतानाही काही लोक रस्त्यावर मास्कचा वापर न करता संचार करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सकाळच्या वेळी व इतर वेळेस नागरिक भाजीपाला मार्केट तसेच किराणा व भुसार माल विकत घेत असताना सोशल डिस्टन्सचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच यापुढे सोशल डिस्टन्स न ठेवल्यास आणि मास्क न वापरल्यास अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांना यापुढे 200 रुपये दंड होणार आहे, तसेच सदर दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्यानंतर दर आठवड्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, असे तहसीलदार अंजली मरोड यांनी दिनांक 1 मे 2020 रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button