Akkalkot

अक्कलकोट पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या तत्परतेमुळे हरविलेले सोन्याचे दागिने मिळाले परत

अक्कलकोट पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या तत्परतेमुळे हरविलेले सोन्याचे दागिने मिळाले परत

कृष्णा यादव, अक्कलकोट

अककलकोट दि.18 :- अक्कलकोट शहरामध्ये गुरुवारी दुपारी 01:00 वाजे च्या दरम्यान सौ चांगुबाई श्रीमंत राठोड राहणार-बोरोटी ता अक्कलकोट यांनी ‘ अक्कलकोट शहरातील सोन्याच्या दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र, कानफुले पैंजण,जोडवे, असे एक लाख आठ हजार किंमतीचे खरेदी केलेले ‘सोने – चांदीचे’ दागिने घाई गडबडीत मुख्य रस्त्यावर कुठे तरी पडून हरवली आहेत असे सांगत सदरची महिला पोलीस ठाणेस तक्रार देण्यासाठी आली असता सदर घटनेचे ‘ गांभीर्य ओळखुन पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांनी ‘तात्काळ डी बी पथकातील पोना महादेव चिंचोळकर , पोका राठोड,पो कॉ शिंपाळे यांना मुख्य बाजार पेठेत पाठवले असता,सदर कर्मचारी यांना आजूबाजूच्या ‘सिसिटीव्ही’फुटेज पाहून चंद्रकांत कटारे दुकानात चौकशी केली असता कटारे यांनीही सदरचे सोने-चांदीचे दागिने’ सापडले आहेत असे प्रामाणिकपणे कबूल केले, त्याबद्दल पोलिस निरीक्षक पुजारी यांनी ‘ कटारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून ज्या महिलेचे सोने-चांदी हरवले आहे, त्यांनाही पोलीस ठानेस बोलावून सोने चांदीची खात्री करूनच सुपूर्त करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button