Akkalkot

जनसेवा_हीच_ईश्वर_सेवा सी.बी.खेडगी चॅरिटेबल ट्रस्ट अक्कलकोट

जनसेवा_हीच_ईश्वर_सेवा सी.बी.खेडगी चॅरिटेबल ट्रस्ट अक्कलकोट

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट,दि.२२:- सी.बी.खेडगी चॅरिटेबल ट्रस्ट अक्कलकोट यांच्यावतीने परराज्यातील 600 नागरिकांना अन्नदान सेवा करण्यात आली. अक्कलकोट तालुक्यात आडकलेल्या उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश व झारखंड व राजस्थान येथील 600 मजुरांना खेडगी परिवाराच्यावतीने जेवणाची व्यवस्था करून दिली व प्रशासनाच्या आदेशाने स्वग्रही पाठवण्यात आले. महाराष्ट्रामधील लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या 600 मजुरांना सोलापूर जिल्हा प्रशासन व अक्कलकोट अक्कलकोटचे तहसिलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट एस.टी महामंडळाची 13 बसेस च्या माध्यमातून सर्व मजुरांना अक्कलकोट येथून सोलापुर रेल्वे स्टेशन पर्यंत बसने सोडण्यात आले व तेथून रेल्वे ने उत्तरप्रदेश व मध्य प्रदेश व राजस्थान येथे पाठवण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हे मजूर अक्कलकोट तालुक्यात येथे अडकुन होते कोरोना लॉकडाउन कधी शिथिल होईल माहित नाही. काम सुरु होईल की नाही हेही माहित नाही म्हणून या मजूरानी घरी जाण्याचा निर्णय घेतला प्रशासनाच्या माध्यमातून एस टी बसेस मिळवून दिले आहे आणि आज सकाळी हे सर्व मजूर उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश झारखंड व राजस्थान ला रवाना झाले आहेत. यावेळी श्री शिवशरण चन्नबसप्पा खेडगी यांनी 600 मजुरांना जेवणाची व्यवस्था करून दिली सर्व मजुरांनी आनंदित होऊन खेडगी मित्रपरिवाराचे व प्रशासनाचे आभार मानून त्यांच्या स्वगृही परतले. याप्रसंगी सी.बी.खेडगी चारीटेबल ट्रस्टचे कर्मचारी व खेडगी मित्रपरिवार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button