Amalner

बाप्पा आले आणि गर्दी झाली…! सोशल डिस्टनगसिंग चा फज्जा…आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन..!भक्त जोमात…प्रशासन कोमात..!

बाप्पा आले आणि गर्दी झाली…! सोशल डिस्टनगसिंग चा फज्जा…आणि कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन..!भक्त जोमात…प्रशासन कोमात..!

अमळनेर येथे आज गणेशोत्सव च्या निमित्ताने बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले.अमळनेर येथील पाच पावली मंदिर जवळ आज गणेशाच्या मुर्त्या व इतर पूजेचे साहित्य घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नुकतेच कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. आजची गर्दी पाहता बाप्पा ने किती जणांना प्रसाद दिला असेल हे येत्या काही दिवसात समजेलच…प्रशासनाने एकाच ठिकाणी विक्री न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केंद्र करणे गरजेचे होते. परंतु आज तुफान गर्दीत बाप्पाला घेताना दुकानदार ग्राहक आणि इतर कोणीही कोव्हिड 19 च्या नियमांचे पालन केले नाही.दुकानदारांनी मास्क लावले नव्हते जे लावणे बंधनकारक होते आणि प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक होते. परंतु पोलीस विभाग वगळता आज ह्या भागात न प प्रशासन,महसूल प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित नव्हते.पोलिसांमध्ये होमगार्ड आणि ट्राफिक पोलीस वाहतूक कोंडी, पार्किंग व गर्दी नियंत्रण ह्या सर्व गोष्टी पाहत होते. मोजक्या 8 ते 10 पोलिसांवर सर्व कामाचा लोड होता.बाजार पेठेत अरेरावी करणारे न प प्रशासनाचे कर्मचारी गायब होते.तर आपत्ती व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते.एकूणच काय तर कोरोना नियम फक्त ठराविकच कार्यक्रमाला लागू होतो की काय अशी शंका येऊ लागली आहे.

आज भक्त जोमात तर प्रशासन कोमात गेलेले होते.कुणी थुंकत होते,खोकलत होते,शिंकत होते वेगवेगळ्या प्रकारचे लोक आज एकाच ठिकाणी जमा झाले होते. आधीच सतत पडणारा पाऊस आणि खराब वातावरण ,न प ची आरोग्य विषयक अनास्था यामुळे शहरात डेंग्यू,ताप सर्दी व्हायरल इन्फेक्शन, चिकन गुनिया इ साथीच्या व इतर रोगांनी जोर धरला आहे. त्यात आता आजच्या परिस्थिती नुसार वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button