Amalner

माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमळनेर न प तर्फे जनजागृती

माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमळनेर न प तर्फे जनजागृती

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात जल जंगल जमीन जनावरे व जनता यांचा शाश्वत विकास करीत असताना कमीत कमी प्रदूषण प्रदूषण होईल अशाप्रकारे आपले जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने विचार करावा जेणेकरून जल प्रदूषित होणार नाही हवा प्रदूषित होणार नाही व निसर्गाची हानी होणार नाही अशा शाश्वत विकासाला आपलेसे करावे अशी हाक अमळनेर नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नोडल ऑफिसर संजय चौधरी करीत असताना त्यांना प्रतिसाद म्हणून अमळनेरातील प्रतीत यश छायाचित्रकार महेंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी स्वच्छ भारत अभियान ही अमळनेर नगरीतील सर्वसामान्यांची चळवळ व्हावी ती फक्त अमळनेर शहरातील सफाई कामगारांची जबाबदारी नसून त्यात प्रत्येकाने हिरिरीने सहभाग नोंदवावा याकरिता जनमानस जागे करण्याचे आव्हान स्वीकारून संजय चौधरी यांचे मार्फत अमळनेर नगरीचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे तसेच नगराध्यक्ष पुष्पलता ताई पाटील यांचे समोर आपली संकल्पना मांडली. यात अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छतेचे आवाहन तसेच स्वच्छता अभियानात सामील होण्यासाठीची प्रतिज्ञा यांचे माहितीपत्रके छापून गावभर वाटणे यासाठी आर्थिक सहाय्य निलेश साळुंखे यांनी दिले त्याचप्रमाणे स्वच्छतेचे संदेश देणारे पोस्टर्स प्रकाशित केले त्याच प्रमाणे शहरात कचरा जमा करणाऱ्या घंटा गाड्यांना स्वच्छतेचे संदेश देणारे स्टिकर चिपकवण्यात येतील. यासोबतच सानेगुरुजी शाळेतील मुले उपस्थितांना राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेत उपस्थितांना शपथ देतील. त्याच प्रमाणे घंटागाडीत स्वच्छतेच्या संदेशाचे माहितीपत्रके सफाई कर्मचारी वार्डात वाटप करतील ही संकल्पना नगरपालिकेच्या अधिकारी पदाधिकारी यांना पसंत पडली व दिनांक 27/10/2021 रोजी सकाळी सहा वाजता नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नगरपालिकेचे सारे कर्मचारी अधिकारी सफाई कर्मचारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नगराध्यक्ष पुष्पलता ताई पाटील, माजी नगराध्यक्ष विनोदभय्या पाटील,आरोग्य सभापती श्याम पाटील महेश पाटील नोडल ऑफिसर संजय चौधरी सॅनिटरी इन्स्पेक्टर चव्हाण साहेब बिराडे ,महेश पाटील,कुंदन पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रथमता संजय चौधरी यांनी माझी वसुंधरा स्वच्छ भारत अभियान या विषयी उपस्थितांना माहिती दिली.

या अभियानाच्या अंतर्गत अनेकांना सामील होण्यासाठी आवाहन करताना उपस्थित नगरसेवक व स्वच्छता कर्मचारी मुकादम यांना आपापल्या वार्ड व प्रभागात अशा प्रकारच्या जनजागृतीसाठी नागरिकांना एकत्रित करून आम्ही स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगणारे व एकूणच पुढील काही दिवसातील स्वच्छ भारत अभियान अंतर्गत होणारे जनजागृतीचे कार्यक्रम जसे शिवाजी गार्डन येथील मॉर्निंग वाघ ग्रुप पटवारी कॉलनी बालाजी पुरा साने नगर कृषी कॉलनी या भागातील पुढील नियोजन कथन केले त्याचप्रमाणे साने गुरुजींच्या पुतळ्यावर सारे उपस्थित रॅली स्वरूपात घोषणा देत पोहोचले साने गुरुजींच्या प्रतिमेला मुख्याधिकारी यांनी पुष्पमाला अर्पण करून साऱ्या उपस्थितांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले तसेच नगरपालिका आवारात वृक्षारोपण द्वारे कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमामुळे शहराच्या स्वच्छ अमळनेर सुंदर अमळनेर या घोषणेला बळ मिळाले असून अमळनेरच्या विविध भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सामील व्हावे अशी भावना कार्यक्रम स्थळी ऐकावयास मिळाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button