रावेर

अभ्यासासह मैदानी खेळांकडेही लक्ष देणे ही काळाची गरज… न्या. आर. एल. राठोड.

अभ्यासासह मैदानी खेळांकडेही लक्ष देणे ही काळाची गरज… न्या. आर. एल. राठोड.

विलास ताठे

रावेर तालुका विधी सेवा समिती तर्फे बाल दिनानिमित्त येथील स्वामी विवेकानंद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे अध्यक्षस्थानावरून बोलताना रावेर न्यायालयाचे न्या. आर. एल. राठोड यांनी वरील उदगार काढले पुढे श्री. राठोड म्हणाले की आज मोबाईल व टीव्ही मुळे मुलांचे बाल पण हिरावले जात असून मुलांनी मोबाईल व टीव्हीचा वापर टाळून अभ्यास करावा. मोबाईल व टीव्ही पेक्षा जास्त वेळ मैदानी खेळात घालविला पाहिजे म्हणजे त्यांचे शारीरिक आरोग्य मजबूत होईल असे आवाहन करून याकडे शिक्षकांनी, पालकांनी व समाजातील जबाबदार घटकांनी पुढे येण्याची गरज आहे. याप्रसंगी सुरुवातीला द्वीप प्रज्वलित करून व पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश आर. एम. लोळगे यांनी मनोगत व्यक्त करताना शिष्यवृत्ती योजना सांगून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तर ऍड. एस.बी. सांगळे यांनी बाल कामगार कायद्याच्या तरतुदीचे महत्व सांगितले, सरकारी वकील प्रवीण वारुळे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने शिक्षणाचा अधिकार कायद्याची तरतूद केली असून पालकांनी याचा लाभ घ्यावा असे विषद केले तर संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार सर यांनी शिष्यवृत्ती मुळे मुलं आपलं आयुष्य यशस्वीपणे जगू शकतात म्हणून जास्त मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षांचा अभ्यास करावा असे आवाहन केले.याप्रसंगी स्वामी विवेकानंद शाळेतील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा न्या. राठोड व न्या. लोळगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड. जगदीश महाजन, सचिव ऍड. बी. डी. निळे, ऍड. व्ही. पी. महाजन, ऍड. प्रविण पासपोहे, ऍड. डी. डी. ठाकूर, ऍड. शाहिद शेख, ऍड. उदय सोनार, ऍड. सलीम जामलकर,पॅरा लीगल व्हालंटीयर राजेंद्र अटकाळे तसेच न्यायालयीन कर्मचारी व स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व ईतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. योगेश गजरे यांनी केले तर सूत्र संचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सौ. वर्षा इंगळे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button