Paranda

घारगाव येथे तरूणावर तलवारीने हल्ला करून जिवे मारन्याचा प्रयत्न जखमीवर बार्शी येथे उपचार सुरू दोन महिला सह पाच जनाविरूध्द गुन्हा दाखल तिन आरोपीस अटक उप विभागीय पोलिस अधिकारी राठोड यांची घटणा स्थळी भेट

घारगाव येथे तरूणावर तलवारीने हल्ला करून जिवे मारन्याचा प्रयत्न जखमीवर बार्शी येथे उपचार सुरू दोन महिला सह पाच जनाविरूध्द गुन्हा दाखल तिन आरोपीस अटक उप विभागीय पोलिस अधिकारी राठोड यांची घटणा स्थळी भेट
सुरेश बागडे परंडा
परंडा : परंडा तालुक्यातील घारगाव येथे किरकोळ कारणा वरून तलवारीने ह्ल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला .
या हल्यात तुषार लटके हा गंभीर जखमी झाला हि घटणा शुक्रवार दि ३० एप्रिल रोजी सकाळी घारगाव येथे घडली जखमीस बार्शी येथील जगदाळे मा हॉस्पीटल मध्ये उपचारा साठी दाखल करण्यात आले .
या बाबत अधिक माहिती अशी की या प्रकरणातील आरोपी प्रकाश लटके यांची मुलगी व जावई मध्ये पटत नसल्याने मुलगी वडीला कडे राहत आहे जावई यास त्यांचा चुलत पुतन्या तुषार लटके फोन फरून भडकवतो असा संशय घेऊन धमकी दिल्याने मी तुमच्या जावयाला कश्याला फोन करू असे सांगण्या साठी दि ३० रोजी तुषार लटके हा चुलत चुलता प्रकाश लटके यांना समजुन सांगण्या साठी गेला असता अमर लटके याने तुला ठार मारतो असे म्हणत तलवारीने तुषार लटके वर हल्ला केला व डोक्यावर मारून गंभीर केले व तुषार चा भाऊ विशाल लटके यांना अमर लटके , आकाश लटके , प्रकाश लटके वंदना लटके , तृप्ती धनाजी चौधरी ,यांनी मारहान केली .
विशाल लटके यांच्या फिर्यादी वरून पाच जना विरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे व भारतीय हत्यार कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आरोपी . अमर लटके , आकाश लटके , प्रकाश लटके यांना अटक करण्यात आली आहे . घटणा स्थळी उप विभागीय पोलिस अधिकारी यांनी घटणा स्थळी भेट दिली असुन पुढील तपास पोलिस उप निरिक्षक बनसोडे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button