Paranda

ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून जागा हडपन्याचा प्रयत्न शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा.

ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून जागा हडपन्याचा प्रयत्न शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा.

सुरेश बागडे परंडा

परंडा : परंडा तालूक्यातील बोडका येथिल धनाजी माने यांनी ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून मालकी हक्कच्या जागेत आतिक्रमन करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करून बांधकाम बंद करावे अन्यथा आत्मदहन करू असा इशारा शेतकरी रघुनाथ करडे यांनी दिला आहे .

गटविकास अधिकारी यांना दि ३ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझ्या वडीलांच्या नावावर बोडका येथिल गट नंबर १४४ मध्ये १ हेक्टर ३६ आर जमीन असुन या गट नंबर सेजारील धनाजी माने यांची १८ बाय २६ फुट जागा आहे .
माने यांनी ग्रामसेवक यांच्याशी संगण मत करून कागदपत्रात जागेची वाढ करून बोगस कागदपत्राच्या अधारे आमच्या मालकी ह्रक्का च्या गट नंबर १४४ मध्ये अतिक्रमन करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच ऑक्ट्रासिटी केस करण्याची धमकी देत आहे .
माने हे दावा करीत असलेली जागा माझ्या मालकीची असुन माने यांचा कसलाही सबंध नाही ,
तरी ८ दिवसात बोगस वाढीव नोंद ची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल तरीही न्याय नाही मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याच इशारा शेतकरी करडे यांनी दिला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button