Ahamdanagar

पवारांच्या घरावरील हल्ला ही पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला न शोभणारी घटना ः ना.प्राजक्त तनपुरे

पवारांच्या घरावरील हल्ला ही पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला न शोभणारी घटना ः ना.प्राजक्त तनपुरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या घरावरील एस्टी कामगारांचा हल्ला ही पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला न शोभनारी घटना आहे असे उदगार महाराष्ट्र राज्याचे उर्जा, उच्च शिक्षण, आणि नगरविकास मंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी काढले ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील तिसगाव-चिचोंडी रस्त्यावरील व्रुधा नदीवर ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या पुलाच्या भुमिपुजना प्रसंगी बोलत होते.अध्यक्ष स्थानी काँम्रेड रामभाऊ दातीर होते.एसटी कामगारांच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी चर्चेला बोलाउन सकारात्मक भुमिका घेतली आहे.पण कामगारांना भडकावन्या मागे कोण आहे याची चौकशी करून दोषींवर कठोरपणे कारवाई करण्यात येणार आहे असे नामदारांनी सांगितले. तिसगाव, लोहसर येथिल जनता दरबारात एकूणसाठ प्रकरणे निकाली काढण्यात आली.या वेळी शंकरवाडी,मीरी, कामतशिंगवे, कोल्हार या गावांनाही नामदारांनी भेटी दिल्या. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,रवींद्र मुळे,राजेंद्र पाठक,देवेंद्र गीते, प्रमोद दगडखैर,कारभारी शिंदे,संभाजी वांढेकर, सुखदेव गीते, बाळासाहेब गीते,नामदेव वांढेकर, काशिनाथ पाटील लवांडे,संजय लवांडे, सुनिल लवांडे,तहसीलदार शामराव वाडकर, क्रुषी अधिकारी शिंदे,विस्तार अधिकारी दादासाहेब शेळके, विजय टापरे,नारायण नजन, रवींद्र मांडे,अतुल बनकर,पोलीस काँन्स्टेबल बोरुडे, यांच्या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button