World

Asia Cup 2022: पाकीस्तान ला झटका..!जरी मिळवला भारतावर विजय..तरी विजयश्री खेचून आणणारा खेळाडू संघातून बाहेर.!

Asia Cup 2022: पाकीस्तान ला झटका..!जरी मिळवला भारतावर विजय..तरी विजयश्री खेचून आणणारा खेळाडू बाद..!
आशिया कपमधील भारतीय संघाच्या विजयी घौडदौडीमध्ये रविवारच्या सामन्यातील पराभवाने अडथळा निर्माण केला. पाकिस्तानने सुपर ४ मध्ये एक शानदार सुरुवात केली. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा ५ विकेटने पराभव केला. हा विजय वीर यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (७१ धावा) याने मिळवला. पण आता पाकिस्तानच्या संघासाठी एक दु:खद बातमी समोर आली आहे. पुढील सामन्यांसाठी पाकिस्तानी संघाला अजून एका डोकेदुखीला समरे जावे लागणार आहे.
रविवारच्या सामन्यात जखमी झालेल्या मोहम्मद रिझवानला रुग्णालयात नेण्यात आले आहे. रिझवानचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. सध्या ही दुखापत किती गंभीर आहे आणि ती बरी होण्यासाठी किती वेळ लागेल, हे सांगता येत नसले तरी पाकिस्तान संघासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, असे मानले जात आहे.

यष्टीरक्षण करताना दुखापत
रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला. यामध्ये टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली होती. दरम्यान, १५ व्या षटकात डोक्यावरुण झेपावून जाणारा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात रिझवान जखमी झाला. रिझवानने खूप मेहनत घेत उंच उडी मारली होती आणि त्यामुळे त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. यानंतर सामना काही काळ थांबवण्यात आला आणि रिजवानला मैदानावरच उपचार देण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर रिझवान उर्वरित सामना खेळला. फलंदाजीतही रिझवानने दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मोहम्मद नवाजला सामनावीराचा किताब मिळाला, पण रिझवानया सामनावीरचा खरा हकदार होता, असं म्हणता येईल. त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे आणि अर्धशतकामुळे संघाला विजय मिळाला.

एमआरआयसाठी दुबईच्या रुग्णालयात नेण्यात आले
सामना संपल्यानंतर लगेचच रिझवानला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्याच रिपोर्ट अजून आलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ही माहिती दिली. पीसीबीने सांगितले की, रिझवानची दुखापत किती गंभीर आहे हे पाहण्यासाठी त्याला सामन्यानंतर लगेचच दुबईतील रुग्णालयात नेण्यात आले.

तीन खेळाडू यापूर्वीच दुखापतग्रस्त
पाकिस्तानचा संघ आधीच दुखापतीने त्रस्त आहे. त्यांचे तीन स्टार खेळाडू यापूर्वीच दुखापतींमुळे संघाबाहेर आहेत. त्यापैकी स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला आशिया कपपूर्वी दुखापत झाली होती. तर मोहम्मद वसीम ज्युनियर आणि शाहनवाज दहानी या स्पर्धेदरम्यानच जखमी झाले. अशा परिस्थितीत जर रिझवानही बाद झाला तर तो पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल, कारण संपूर्ण फलंदाजी रिझवानच्या खांद्यावर आहे. संघाचा कर्णधार बाबर आझम अद्याप फॉर्मात नाही.

रिझवानच्या खेळीमुळे संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला
या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ७ गडी गमावून १८१ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ४४ चेंडूत ६० धावा केल्या. कोहलीचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. त्याने आपल्या खेळीत एक षटकार आणि ४ चौकार मारले. पाकिस्तानकडून शादाब खानने सर्वाधिक दोन बळी घेतले.
हा सामना शेवटच्या षटकापर्यंत चालला. यामध्ये १८२ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तान संघाने ५ गडी गमावून १८२ धावा करत सामना जिंकला. मोहम्मद रिझवानने ५१ चेंडूत ७१ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय मोहम्मद नवाजने २० चेंडूत ४२ धावा केल्या. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ७३ धावांची भागीदारी केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button