Gondiya

राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या अधिवेशन संपन्न

मालवा प्रदेशातील परमार समाजासोबत एकीककरणासह बैहर येथील राम मंदिर ट्रस्टच्या जागेवर आयुर्वेद महाविद्यालय
ओबीसींची जातनिहाय जनगणनेसोबत पोवारी भाषेचाही उल्लेख व्हावा

आदी ठरावांना राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या अधिवेशनात मंजुरी

राजेश सोनुने

गोंदिया: राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभा व पवार राममंदिर टड्ढस्ट बैहर तसेच राजाभोज स्मारक समितीच्यावतीने मध्यप्रदेशातील बैहर येथे राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेच्या २८ जानेवारीला पार पडलेल्या अधिवेशनात विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली.यामध्ये मध्यप्रदेशातील मालवा प्रदेशातील परमार समाजाचे पवार समाजासोबत एकीकरण करणे,बैहर येथील राम मंदरी ट्रस्ट्रच्या परिसरात आर्युवैद महाविद्याल सुरु करणे यासह वसंत पंचमीला शासकीय सुट्टी मिळण्यासोबतच येत्या होऊ घातलेल्या जनगणनेत ओबीसींचा प्रवर्ग तयार करुन जातनिहाय जनगणना करुन पोवारी भाषेचा उल्लेख करण्याचा ठराव सर्वसमंतीने घेण्यात आला.

राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेच्या अधिवेशन संपन्न

या अधिवेशनाला महाराष्ट्र,मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान,हरियाणासह विविध राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या अधिवेशनाची सुरवात ध्वजारोहण करुन करण्यात आली.अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रिय अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे होते.अधिवेशनाच्या सुरवातील महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशजी देशमुख यांनी स्वागतपर विचार व्यक्त करतांना महासभेने गेल्या अधिवेशनापासून आजपर्यंत समाजपयोगी हिताचे निर्णय घेतले असून देशातील सर्व पवार,परमार समाजाला एकत्र आणण्यावर भर देत असल्याचे सांगितले.जुर्ले २०१८ पासून ते आजपर्यंतच्या झालेल्या महासभेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावांचे वाचन महासभेच्या महासचिव पुष्पा निरजंन बिसेन यांनी केले.त्याचप्रमाणे ठरावासंह समाजातील विवाहपध्दतीत होत असलेले अवडंबर,महासभेला गावपातळीवर नेणे आदी सामान्य सभेतील विषयाचे सविस्तर वाचन महासभेचे छत्तीसगड राज्याचे उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी केले.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.टेंभरे यांनी राष्ट्रीय महासभा सर्वांना सोबत घेऊन काम करीत असून गावपातळीवर जाऊन महासभेचा विस्तार करण्यावर भर असल्याचे सांगितले.सोबतच गावपातळीवरील आणि इतर पवार समाजातील संघटनांना महासभेशी जोडण्यात येणार असल्याचे सांगितले.

१९६४मध्ये भोयर पवार या शाखेचे पवार(पोवार)समाजासोबत एकीकरण करण्यात आले असून या दोन्ही शाखेत आज सामाजिक व्यवहार व संबध स्थापित झालेले असून मध्यप्रदेशातील मालवा भागात असलेल्या परमार समाजाची विचारधारा,संस्कृती,राहणीमान ही सर्व आपल्यासारखीच असून ते सुध्दा राजाभोज यांनाच मानत असल्याने त्या समाजाला सुध्दा आपल्यासोबत जोडून घेण्यासंबधी आजच्या अधिवेशनात चर्चा सर्वांच्या उपस्थितीत होत असल्याचे जाहिर केले.जुमदेवपंथ स्विकारणाèया समाजातील लोकांना आपल्या समाजासोबत जोडण्यावरही त्यांनी भर दिला.तसेच राममंदीर ट्रस्टच्या जागेवर आयुर्वेद महाविद्यालय स्थापन करणे आणि येत्या २०२१ च्या जनगणनेत आपल्या समाजाची ओबीसी प्रवर्गामध्ये जनगणना व्हावी यासाठी सर्वांनी प्रगणकासोबतच शासनाकडे पोवारी,भोयर-पवारी,आपल्या मातृभाषेचा उल्लेख करण्याचे आवाहन केले.
मंचावर उपस्थित राष्ट्रीय महासचिव पुष्पा बिसेन,शिवनी जि.प. अध्यक्ष मिना बिसेन,राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेश देशमुख,राजेंद्र पटले,अशोक बिसेन, मोतीलाल चौधरी,राष्ट्रीय पवार क्षत्रीय महासभेचे माजी अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टेंभरे,अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ.एन.डी.राऊत, गौरीशंकर टेंभरे,शंकरलाल पवार,मालवा येथील बन्नोqसह परमार,जालंधर येथील जालमqसह सोडा,हरियाणातील वेदपालqसह परमार,पुणे येथील मनोहर पवार,देवासचे कुंजीलाल परमार,आष्टाचे आनंद परमार,डॉ.गुलाब परमार,शैलेंद्रqसह परमार,भवानीqसहजी परमार,एन.आर.डोंगरे,माजी आमदार हेमंत पटले,माजी आमदार मधु भगत,प्रभाकर खौसी,देविका कटरे,किरणलता चोपडे,पुष्पलता बारंगे,राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रल्हाद पटले,कोषाध्यक्ष रमेश टेंभरे,सिवनी पवार समाज संगठन अध्यक्ष हरकचंद टेंभरे,कारंजाचे भगवान बन्नगरे,वारासिवनीचे जे.एल.बिसेन,गोमती ठाकूर,मोसम हरिणखेडे,लेखqसह राणा,रायपूर सगंठन अध्यक्ष किरणकुमार चव्हाण यांच्यासह अनेकांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.अधिवेशनाच संचालन राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय संगठन सचिव खेमेंद्र कटरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बिसेन यांनी मानले.या राष्ट्रिय अधिवेशनाला राष्ट्रीय महासभेचे सर्व पदाधिकारी,कार्यकारीणी सदस्य,देशातील विविध राज्यातील व जिल्ह्यातील पवार समाज संघटनेचे पदाधिकारी यांच्या समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा,राम मंदिर ट्रस्ट व राजाभोज स्मारक समितीसह बैहर येथील नगर संगठनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारीणी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Back to top button