Maharashtra

अमळनेर नगरपरिषदेकडून जन्म दाखला घेण्यासाठी नागरिकांना माराव्या लागतात फेऱ्या…..काय आहे नेमके गौडबंगाल…..

अमळनेर नगरपरिषदेकडून जन्म दाखला घेण्यासाठी नागरिकांना माराव्या लागतात फेऱ्या…..

अमळनेर नगरपरिषदेकडून जन्म दाखला घेण्यासाठी नागरिकांना माराव्या लागतात फेऱ्या.....काय आहे नेमके गौडबंगाल.....

काय आहे नेमके गौडबंगाल…..

अमळनेर प्रतिनिधी

शासकीय नियमानुसार प्रत्येक व्यक्तीला जन्म दाखला हा 21 दिवसात मिळणे आवश्यक आहे. अनेक नगरपालिकांमध्ये तपास केल्या नंतर 21 दिवस किंवा फारतर 30 दिवसात नागरिकांना जन्म दाखला मिळतो अशी माहिती मिळाली. परंतु अमळनेर नगरपरिषदेत मात्र जन्म दाखला मिळण्याचा कालावधी हा कमीत कमी 2 ते 3 महिने किंवा यापेक्षा ही जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक नागरिकांनी या संदर्भात तक्रार केली असून जन्म दाखला मिळविण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जन्म दाखला खाते  कोणत्या ठेकेदाराला दिले आहे आणि त्यावर नगरपरिषद अधिकारी आणि लोक प्रतिनिधी यांचे नियंत्रण नसून यातच काहीतरी गौडबंगाल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सामान्य नागरिकांचा जन्म दाखला मिळणे हा अधिकार आहे आणि नगरपरिषद प्रशासन हात वर करून ठेकेदारांच्या मागे लपत असल्याचे दिसून येत आहे.

एका दिवसाला किती जन्म दाखले अर्ज प्राप्त होत असतील आणि 21 दिवसात जर नगरपरिषद प्रशासन ते देऊ शकत नसेल तर नगरपरीषदेच्या कार्यक्षम प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे या संदर्भात  नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तक्रारदार नागरिक नगरपरिषदेत आंदोलन करतील याची नोंद घ्यावी. असे तक्रारदार नागरिकांनी सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button