Jalgaon

?️ Big Breaking…जिल्हयात ३० जून पर्यंत लॉकडाऊन असणार, सलुन दुकाने, शाळा, सिनेमागृहे राहणार बंद : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांचे आदेश

जिल्हयात ३० जून पर्यंत
लॉकडाऊन असणार, सलुन दुकाने, शाळा, सिनेमागृहे राहणार बंद : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांचे आदेश

रजनीकांत पाटील

जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जळगांव जिल्ह्यात ३०जून २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत.

या आदेशात त्यांनी नमूद केले आहे की, जळगांव जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक, शाळा, महाविदयालये, प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस, सिनेमागृह, शॉपींग मॉल, व्यायामशाळा, क्रीडा संकूल, स्विमींग पूल, बगीचे, पार्कस् , सभागृहे, ऑडीटोरीयन, सामाजीक, धार्मिक, राजकिय, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्मक्रम तसेच इतर गर्दी होणारे कार्यक्रम बंद राहणार आहेत. तसेच धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, धार्मिक सभा, पारिषदा इ. बंद राहतील. संपूर्ण जिल्हयात सलून दुकाने, स्पा सेंटर, ब्युटी पार्लर, बार्बर शॉप, हॉटेल्स, रेस्टारंट बंद राहणार आहेत.

जळगांव जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी लॉकडाऊनचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून आदेशाचा भंग झाल्यास 1860(45)चे कलम 188 नुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा2005 मधील कलम 51 ते 60नुसार संबधीता विरूध्द कायदेशीर कारवाई केली जाणार आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button