Pandharpur

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सांगोला : येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री.भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार म्हणाले कि, राजमाता जिजाऊ कणखर निर्भीड, हिम्मतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. त्यांनी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडविले, तसेच शंभूराजांना देखील घडविले. स्त्रीदेखील पुरुषांप्रमाणेच हिम्मतवान, बुद्धिवान, कर्तृत्वान, पराक्रमी, शूर, दूरदृष्टीची असते, हे जिजाऊंनी दाखवून दिले. आपल्या सर्वांचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे जिजाऊ माँसाहेब यांना विनम्र अभिवादन!
सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अभिमान कणसे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी बोलताना म्हणाले कि, १८९३ मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो’ या दोनच शब्दांनी संपूर्ण जगाला जिंकले होते. या भारतीय तत्वज्ञाचा पाश्चात्यांच्या विज्ञानवादापर्यंत समन्वयाचा खळखळाट करत वाहणाऱ्या त्यांचा अमोघ वक्तृत्त्व वाणीने सारे पाश्चात्य देश दिपून गेले. समाजमनावर आदर्शाचे प्रतिबिंब उमटले. त्यांच्या महान तेजाने सारे जगच दिपून गेले आणि त्यांच्या “महान विचारांनी दशदिशाही प्रकाशमान झाल्या अशा या युगपुरुषाला विनम्र अभिवादन. यावेळी संस्थेचे संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार, अकॅडमिक डीन प्रा. टी. एन. जगताप, सर्व शाखांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button