Chimur

अंगणवाडी ताईं धडकल्या एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर

अंगणवाडी ताईं धडकल्या एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर

सात तालुक्यातील अंगणवाडी ताईचा समावेश

ता, प्र, डॉ, ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर –
मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व इतर मागन्यासाठी मंगळवार ला दुपारी हुतात्मा स्मारक येथुन अंगणवाडी ताईचा मोर्चा थेट चिमूर पंचायत समिती एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकला या मोर्चा चे नेतृत्व महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांनी केले
कोरोणा काळात कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी ताई महागाईने भरडल्या आहेत ताईकडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत त्यामुळे निराश अंगणवाडी ताई कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागन्यासाठी मोर्चा एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर काढला मोर्चा चे रूपांतर सभेत झाले.
अंगणवाडी कर्मचारी सभाचे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी, माधुरी रमेश विर इंदिरा आत्राम चिमुर प्रभा विश्वनाथ चामटकर सीतारा शेख नागभीड लता राजु देवगडे भद्रावती ललीता सोनुले सिंधुताई मद्दावार मुल विद्या वारजुकर दामिनी दोनाडकर ब्रम्हपुरी कमल बारसागडे शोभा मेश्राम सिंदेवाही अन्नपुर्णा हिरादेवे सुनिता कुंभारे वरोरा यांनी अंगणवाडी ताई विषयी मनोगत व्यक्त केले. एकात्मीक बाल विकास प्रकल्प च्या विस्तार अधिकारी रजनी कुंभारे यांनी निवेदण स्विकारले. त्यानंतर तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना अंगणवाडी शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनाची प्रत चिमूर एकात्मीक बाल विकास प्रकल्प मार्फत महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास आयुक्त मुंबई, व तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवीन्यात आली.
या मोर्चात सात तालुक्यातील हजारो अगंणवाडी ताई कर्मचारी यांनी सहभाग दर्शवीला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button