India

Amazing: Space Wonder: पृथ्वी इतक्या वेगात फिरते तरी आपल्याला जाणवत का नाही…? वाचा शास्त्रीय कारण आणि पहा सर्वात प्रथम पृथ्वी वरूनच घेतलेला पृथ्वीचा फिरताना व्हिडिओ….

Amazing: Space Wonder: पृथ्वी इतक्या वेगात फिरते तरी आपल्याला जाणवत का नाही…? वाचा शास्त्रीय कारण आणि पहा सर्वात प्रथम पृथ्वी वरूनच घेतलेला पृथ्वीचा फिरताना व्हिडिओ….

पृथ्वी ही दर २३ तास ५६ मिनिटे आणि ४ सेकंदांनी स्वत: भवती एक परिक्रमा पूर्ण करते. त्यापैकी अर्धा दिवस असते, तर अर्धा वेळ रात्र असते. पृथ्वीचा फिरण्याचा वेग ताशी १६७४ किलोमीटर इतका आहे. म्हणजेच ज्या वेगाने लढाऊ विमानं उडतात त्याच वेगाने पृथ्वी फिरते. तुम्ही लढाऊ विमानांवर उभं राहून प्रवास करू शकत नाही. पण, पृथ्वीवर तुम्ही उभे आहात आणि ती इतक्या वेगाने फिरतेय याची तुम्हाला जाणीवही होत नाही.
ही गती आणि रोटेशन दाखवण्यासाठी शास्त्रज्ञ एकतर स्पेस स्टेशनवरून व्हिडिओ बनवतात किंवा कोणत्याही उपग्रहावरून शूट करतात. पण, जमिनीवर उभं राहून पृथ्वीला फिरताना कोणी पाहिलं आहे का? नक्कीच नाही. सध्या असाच एक व्हिडिओ पुढे आला आहे. ज्याने पृथ्वीचा वेग आणि फिरण्याचा अचूक अंदाज तुम्हाला येईल.

इतकंच नाही तर पृथ्वीचा सूर्याभोवती परिक्रमा घालण्याचा वेगही खूप जास्त आहे. पृथ्वी सूर्याभोवती १.०७ लाख किलोमीटर वेगाने एक परिक्रमा पूर्ण करते. म्हणून एक वर्ष पूर्ण होण्यासाठी ३६५ दिवस लागतात. पृथ्वीच्या मध्यभागी असलेला विषुववृत्ताचा भाग सर्वात रुंद आहे. म्हणजेच त्याचा व्यास ४०,७०० किलोमीटर आहे. या रेषेवर पृथ्वीचा वेग ताशी १०३७ किलोमीटर आहे. पण, जसजसे तुम्ही ध्रुवांकडे जाल तसतसे तुम्हाला हा वेग इतका मंद झालेला दिसेल की तुम्हाला दिवस आणि रात्र होतच नाहीये, पृथ्वी अजिबात फिरत नाहीये असंच वाटेल.

सूर्यापासून पृथ्वीचे अंतर हे १४.९ कोटी किलोमीटर आहे. आता तुम्ही म्हणाल की पृथ्वीचा RPM म्हणजे प्रत्येक राऊंड पर मिनिट किती आहे. पृथ्वी २४ तासात स्वतःभोवती फिरते. न्यूटनच्या गतीच्या नियमानुसार त्याचा RPM .०००६९४ आहे. माणूस जास्तीत जास्त ४ आरपीएमपर्यंत सहन करु शकतो. हे ओलांडल्यास आजारपण किंवा मृत्यू होऊ शकतो.

पृथ्वी ज्या वेगाने भ्रमण करते तो वेग आपल्याला जाणवत नाही, कारण
आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाशी जोडले गेलो आहोत आणि त्यामुळे पृथ्वी
आणि आपल्यामध्ये कोणतेही थेट relative motion नाही. आपण
देखील त्याच वेगाने फिरत आहोत ज्या वेगाने पृथ्वी फिरत आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की relative motion म्हणजे काय ?
तसे पाहायला गेले तर, सर्वच motion ह्या relative असतात. परंतु आपले शरीरदेखील पृथ्वीसोबत फिरत असल्या कारणाने, आपले शरीर स्थिर असते.
म्हणजेच पृथ्वी ज्या दिशेने फिरत आहे त्याच दिशेने आपले शरीर देखील फिरत असते. हेच कारण आहे की आपल्याला पृथ्वीच्या फिरण्याचा वेग जाणवत नाही.

आपण एका उदाहरणासह ही प्रक्रिया समजून घेऊ म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल.
समजा तुम्ही चालत्या बसमध्ये कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात, तर ते पुन्हा तुमच्या हातातच येऊन पडेल. कारण तुम्ही बसच्या गतीने जात आहात. त्यामुळे त्या गतीचा कॉईनवर कोणताच परिणाम होणार नाही.
पण समजा रस्त्यात एक मोठे वळण आले आहे आणि बस ज्यावेळेस त्या वळणावर असेल, नेमके त्याचवेळेस तुम्ही कॉईन टॉस करण्याचा प्रयत्न केलात तर मात्र त्याचा कॉईनवर परिणाम होईल. अशावेळी ते कॉइन इतरत्र जाऊन पडेल. कारण बसने वेगळ्या दिशेमध्ये गती घेतल्यामुळे कॉईनची स्थिर स्थिती बदलली आणि कॉईन देखील बसच्या गतीबरोबर जाऊ लागला.

त्याचप्रकारे, आपण देखील पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहतो. त्यामुळे आपल्याला पृथ्वीची गती जाणवत नाही. आपल्याला पृथ्वीची गती तेव्हाच जाणवेल, जेव्हा पृथ्वीच्या गतीमध्ये फरक पडेल, तिला हादरा बसेल किंवा जेव्हा पृथ्वी तिची दिशा बदलेल.

शांघाई माग्लेव ट्रेन ही जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. तिचा वेग आहे ताशी ४३१ किमी!
पण आपल्या पृथ्वीचा वेग त्याहून कितीतरी जास्त म्हणजे ताशी १६७० किमी इतका आहे. जर तुम्ही कधी या ट्रेनने प्रवास केलात तर त्यावेळेस ट्रेनमध्ये जोरात उडी मारून पहा, जेव्हा तुम्ही हवेत असाल तेव्हा तुमचा पृथ्वीशी असलेल्या गतीसोबतचा संपर्क तुटेल आणि तुम्ही चांगलेच धडपडाल!

पृथ्वी फिरते पण ते आपल्याला का कळत नाही? कारण, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण त्याच्या पृष्ठभागावर चिपकून राहातो. अशा प्रकारे आपण पृथ्वीसोबत फिरत राहातो आणि आपल्याला त्याबाबत कळतही नाही.
हा व्हिडिओ नेदरलँडच्या सँडरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांच्या पोस्टवर असे लिहिले आहे की, फोटोग्राफर्स गायरोस्कोपिक कॅमेऱ्याच्या मदतीने पृथ्वीच्या परिक्रमेचा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. १९ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पृथ्वी कशी फिरताना दिसत आहे, हे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button