Amalner

Amalner:अल्पश्या आजाराने दीड वर्षाच्या बालकाने गमावला जीव..कुटुंबावर आघात…

Amalner:अल्पश्या आजाराने दीड वर्षाच्या बालकाने गमावला जीव..कुटुंबावर आघात…

अमळनेर शहरातील मुंदडा नगर येथील रहिवासी वाल्मिक पाटील यांच्या दीड वर्षाच्या बालकावर अल्पशा आजाराने दीड वर्षीय काळाने झडप घातल्याची घटना रविवारी घडली.उपचार करूनही मुलगा बरा न झाल्याने सदर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाल्मिक रोहिदास पाटील हे अमळनेर तहसील कार्यालयात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा विहानला २७ ऑगस्टपासून सर्दी, खोकला, ताप येत असल्याने त्याच्यावर शहरातील बाल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळेस त्याची तब्बेतीत सुधारणा झाल्याने त्याची सुट्टी करण्यात आली होती. परंतु १७ सप्टेंबर ला पुन्हा त्रास व्हायला लागला म्हणून पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर त्याला पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून २४ रोजी पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र ह्यावेळेस त्याच्या तब्बेतीत सुधारणा झाली नाही म्हणून त्यास २५ रोजी सकाळी त्याला पुन्हा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाल्मिक पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
करण्यात आली आहे.ठोस प्रहार परिवार वाल्मिक यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button