Amalner

अमळनेर:महसूल टीम अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात सक्रिय..!एक ट्रॅक्टर तहसील ला जमा..!

अमळनेर:महसूल टीम अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात सक्रिय..!एक ट्रॅक्टर तहसील ला जमा..!

अमळनेर येथे चारही बाजूंनी सतत अवैध वाळू उपसा होत असतो. मध्यंतरी महसूल विभागाचे या गोष्टी कडे दुर्लक्ष झाले असले तरी आता मात्र महसूल विभागाची कार्यवाही सुरू झाली आहे. आज मौजे अमळनेर येथे अवैधरीत्या गौणखनिज वाळू वाहतूक करणारे १ ट्रॅक्टर तहसील कार्यालय अमळनेर येथे मुद्देमालासह जमा करण्यात आले आहे.
या पथकात श्री गणेश महाजन, तलाठी अमळनेर, श्री स्वप्नील कुलकर्णी तलाठी जूनोने, श्री धीरज देशमुख तलाठी पातोंडा, श्री आशिष पारधे तलाठी सारबेटे, श्री जितेंद्र पाटील तलाठी जळोद, श्री हर्षवर्धन मोरे तलाठी हेडावे, श्री सचिन बमनाथ तलाठी बामणे इ चा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button