Amalner

Amalner: अल्पवयीन मुलीचा विनयभंग.. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.. दोन आरोपी अटकेत…

Amalner: अल्पवयीन मुलीचा विनयभंग.. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.. दोन आरोपी अटकेत…

अमळनेर: तालुक्यातील पळासदळे येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात सारबेटे येथील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, पळासदळे येथील 13 वर्षीय एका मुलीला सारबेटे येथील भुऱ्या व साहिल यांनी ओळखीचा फायदा घेत दि 9 रोजी सकाळी 11
वाजता बसस्थानकावर बोलावून नंतर मोटरसायकल वर बसवून तिला फिरवण्याच्या उद्देशाने धार येथील टेकडीवर घेवून गेले.व तिचा जबरदस्तीने विनयभंग केला. मुलीने तक्रारी नुसार साहिल व भुऱ्या या दोघांविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास पो उप. नि विकास शिरोळे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button