Amalner

Amalner: मांडळ येथे जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड..!

Amalner: मांडळ येथे जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड..!

अमळनेर येथील मांडळ गावात सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर मारवड पोलिसांनी धाड टाकली.या कार्यवाहीत मुद्देमालासह एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.

मारवड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. जयेश खलाने यांना मांडळ येथील अवैध जुगार सुरू असतो अशी गोपनीय माहितीनुसार मारवड पोलिसांनी धाड टाकली. मांडळ बस स्थानकाच्या आडोश्याला जुगार सुरू असल्याचे दिसून आले.पुंडलिक निंबा कोळी सट्टा जुगार चालवीत होता. यावेळी त्याच्याकडे 2840 रु,कार्बन पेपर, आकडे व पैसे लिहलेली वही असे जुगाराचे साहित्य आढळून आले. सदर आरोपीस ताब्यात घेतले आहे . मुं. जु. अँक्ट कलम 12 अ अन्वये मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button