Amalner

Amalner: पतंजली च्या नावावर तरुणाला  33 हजारांचा ऑनलाइन  गंडा..!

Amalner: पतंजली च्या नावावर तरुणाला 33 हजारांचा ऑनलाइन गंडा..!

अमळनेर येथे पतंजली च्या नावावर बनावट बेवसाईच्या माध्यमातून तरूणाला ३३ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सुमित अशोक पाटील (वय-४१) रा.अमळनेर एका खासगी हॉस्पीटलमध्ये काम करतात. पतंजली योगपीठ हरीद्वार
या ठिकाणी असलेल्या शिबीरात कसे जावे यासाठी त्यांनी गुगल सर्च मध्ये जावून
माहिती घेतली. त्यावर त्यांना मिळालेल्या एका नंबरवर कॉल केला असता त्यांना
समोरील व्यक्तीने आमचा एजंट तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करेल असे सांगितले.
त्यानुसार त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्यांनी सांगितले की, सात
दिवसांचा हा कोर्स आहे. यासाठी हरीद्वार येथे तूम्हाला यावे लागेल, उपचारासाठी खर्च नसतो परंतू राहण्यासाठी २० हजार रूपये खर्च लागेल असे सांगितले. त्यानुसार सुमित पाटील यांनी २० हजार रूपये ऑनलाईन पाठविले.पुन्हा समोरील व्यक्तीने पैसे मागितले म्हणून सुमित पाटीलने १३ हजार रूपये ऑनलाईन पाठविले. दरम्यान सुमित यांनी अमळनेर शहरातील पतंजली शॉप मध्ये जावून चौकशी
केली असता शिबीरात जाण्यासाठी अशी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन पध्दत नसल्याचे कळले.त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे अमीतच्या लक्षात आले. अमित ने दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अनोळखी नंबर धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स फौ विलास पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button