Amalner

Amalner:बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल पंप ऑपरेटरला मारहाण..!

Amalner:बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून एकास मारहाण..!

अमळनेर शहरातील शिव पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल दिले नाही म्हणून ऑपरेटरला तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापतबकेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर शहरातील शिव पेट्रोल पंप येथे शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पेट्रोल पंप ऑपरेटर पंकज सुरसिंग वानखेडे रा. झाडी ता. अमळनेर हा कामावर असतांना त्याठिकाणी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. अमळनेर हे दुचाकीने आले व त्यांनी बाटलीत पेट्रोल मागितले. त्यावर ऑपरेटर पंकज वानखेडे यांनी बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिला. याचा राग येऊन वरील तिघांनी शिवीगाळ करून पंपावरील स्टीलच्या रॉडने ऑपरेटर पंकजच्या डोक्यात मारले. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पंकज वानखेडेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी उमेश पाटील, यश पाटील आणि बाबू भगवान (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button