Amalner

Amalner: अधिकारीच करताय नियमांचे उल्लंघन..!आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा प्रांत यांनी याचे जरूर उत्तर द्यावे..! दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण..!सामान्य जनतेकडून मास्क च्या नावावर लूट..!अधिकाऱ्यांना नैतिक अधिकार आहे का आता दंड वसूल करण्याचा.?

Amalner: अधिकारीच करताय नियमांचे उल्लंघन..!आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा प्रांत यांनी याचे जरूर उत्तर द्यावे..! सामान्य जनतेकडून मास्क च्या नावावर लूट..!अधिकाऱ्यांना नैतिक अधिकार आहे का आता दंड वसूल करण्याचा.?

अमळनेर येथे पोलीस ग्राउंड येथे दि 26 जाने रोजी अमळनेर येथे प्रजासत्ताक दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ह्या कार्यक्रमात मुख्याधिकारी सरोदे वगळता कोणीही मास्क लावला नाही.सोशल डिस्टनगसिंग चा थांगपत्ता नाही..असे चित्र आढळुन आले. सध्या कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे असे असताना अमळनेर नगरपरिषद व पोलीस प्रशासन सामान्य लोकांना मास्क न लावल्याबद्दल 200/ 500 रु दंड ठोठावत आहे.आताच शासकीय डॉ आणि अमळनेर नगरपरिषद चे काही अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होते व आहेत.असे असताना प्रशासकीय अधिकारी च नियमांचे उल्लंघन करत असतील तर त्यांना सामान्य नागरिकाला वेठीस धरण्याचा अधिकार आहे का? यांच्या वर कोण कार्यवाही करेल? अधिकारांचा अधिकारी अमळनेर तालुक्यात गैरवापर करत आहेत.अशी चर्चा गावात सुरू आहे.

आज पोलीस व न प पथकाने 14 लोकांवर 200 रु दंड करून कार्यवाही केली आहे.सामान्य नागरिकांना कायद्याचा आणि नियमांचा बडगा दाखवत जबरदस्ती मास्क लावला नाही म्हणून वसुली केली जात आहे. पण ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्मचारी सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. आधीच गेल्या 2 वर्षांपासून कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे लॉक डाऊनमुळे रोजगार बंद झाले आहेत. लोकांना काम नाही,उत्त्पन्न नाही,शेतकऱ्यांचे बदलत्या हवामानामुळे जबरदस्त नुकसान झाले आहे. बेमोसमी पाऊस आणि वादळ यामुळे पिके होत्याची नव्हती झाली .लहान व्यापारी रोज मरत आहे.मोठया व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. अत्यन्त बिकट अशी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात प्रशासन जबरदस्तीने कायद्याचा बडगा दाखवत सामान्य माणसाला मास्क लावला नाही म्हणून दंड घेत नआहे.ज्यांची रोजची कमाई 200 रु नाही त्यांनाही 200 रु चा दंड केला जात आहे. अश्या शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.इथे परत भेदभाव आहेच एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या ओळखीच्या माणसाला लगेच पावती न फडता सोडून दिले जाते.

वरिष्ठ अधिकारी, लोक प्रतिनिधी नियमांचे उल्लंघन करत आहेत याचे उत्तम उदा 26 जाने रोजी दिसले आहे. या अधिकाऱ्यांना नैतिक अधिकार आहे का नागरिकांकडून दंड वसूल करण्याचा असा प्रश्न जनता विचारत आहे.याच उत्तर अधिकाऱ्यांनी जरूर द्यावे की जेणे करून सामान्य नागरिकांना उत्तरे मिळतील.जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेत हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button